सोलापूर : जगाच्या पातळीवर वेगवेगळ्या स्वरुपात अनेक आर्थिक घोटाळे होतात. यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध नसलेले सामान्य नागरिकही भरडले जातात. हे घोटाळे सध्याच्या आधुनिक काळात रोखण्यासाठी फॉरेन्सिक अकाउंटिंग होणे गरजेचे असले तरी जगात सर्वात पहिला फॉरेन्सिक अकाउंटंट म्हणून चाणक्यची ओळख असल्याचा दावा आर्थिक गुन्हेगारीच्या अभ्यासक, फॉरेन्सिक अकाउंटंट अपूर्वा जोशी यांनी केला आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या दक्षिण सोलापूर शाखेच्यावतीने अपूर्वा जोशी यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी आर्थिक गुन्हेगारी तथा घोटाळ्यांचे अंतरंग उलडूगन दाखविले. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घारगे यांनी अपूर्वा जोशी यांची अभ्यासपूर्ण प्रश्नांतून प्रकट मुलाखत घेतली. यावेळी जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा – सोलापूर : नवीन किमान वेतन अधिसूचनेवर यंत्रमाग कामगार फेडरेशन हरकती नोंदविणार

हर्षद मेहता शेअर घोटाळ्यापासून सत्यम, नीरव मोदी अशा अनेक घोटाळ्यांचा वेध घेत अपूर्वा जोशी यांनी असे घोटाळे अचानक होत नाहीत. तर त्याची काही काळापर्यंत पार्श्वभूमी असते. सामान्य मध्यमवर्गीय मंडळी अपेक्षेपेक्षा जास्त लाभाच्या मोहापायी घोटाळ्याची शिकार ठरतात. त्यासाठी समाजात आर्थिक साक्षरता वाढणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – “येत्या काळात बरेच धमाके होणार, अनेकजण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

११ सप्टेंबरच्या अमेरिकेतील अतेरिकी हल्ल्यामागे ओसामा बिन लादेनचा हेतू अमेरिकेचे केवळ शारीरिक हल्ला करण्याचा हेतू नव्हता. तर आर्थिक नुकसान करण्याचाही हेतू होता. यात त्याने बरेच काही साध्य केल्याच्या घटनेचा उल्लेखही त्यांनी केला. मसाप दक्षिण सोलापूर शाखेचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी प्रास्ताविक तर अध्यक्षा रेणुका महागावकर यांनी स्वागत केले.