Worli Election Result: Aaditya Thackeray vs Sandip Deshpande vs Milind Deora Vote Counting Live Updates : बुधवारी (२० नोव्हेंबर) रोजी राज्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. मुंबईतील वरळी मतदारसंघात यंदा चुरशीची लढत आहे. मुंबईतील वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे विरुद्ध संदिप देशपांडे विरुद्ध मिलिंद देवरा हे तीन प्रमुख उमेदवार असून या तिघांपैकी कोण बाजी मारणार? हे आज मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.
Worli Assembly Election Results Live Updates : वरळी मतदारसंघातील घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
Worli Vidhan Sabha Aditya Thackeray Result Live: मतांचे विभाजन आदित्य ठाकरे यांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे
यंदा मनसे व शिवसेना (शिंदे) स्वतंत्रपणे लढत आहेत. त्यामुळे होणारे मतांचे विभाजन व स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये असलेला संभ्रम या बाबी आदित्य ठाकरे यांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.
Worli Vidhan Sabha Result: आदित्य ठाकरे यांचा मार्ग अधिक सोपा ?
शिवसेना (शिंदे) आणि मनसेचे उमेदवार परस्परांच्या विरोधात समोर असल्याने आदित्य ठाकरे यांचा मार्ग अधिक सोपा झाला. लोकसभा निवडणुकीत वरळीत शिवसेनेच्या ठाकरे गटाला सहा हजार मतांची आघाडी मिळाली होती. तेव्हा शिवसेना (शिंदे), भाजप आणि मनसे एकत्र होते.
Worli Vidhan Sabha Election Result Live Updates : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात किती मतदान झाले होते?
जवळपास सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात ५२.३८ टक्के इतके मतदान झाले होते.
निवडणुकीत मुंबईकरांच्या मतदानाचा टक्का २०१९च्या तुलनेत वाढल्याचे पाहायला मिळाले.
वरळीत चुरशीची लढत
वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे विरुद्ध संदिप देशपांडे विरुद्ध मिलिंद देवरा या तिघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. याठिकाणी जनतेचा कौल कुणाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.