लोकसत्ता प्रतिनिधी

सांगलीतला तरुण पैलवान सूरज निकमने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सूरज निकम हा कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान होता. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत. कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करुन आस्मान दाखवणाऱ्या सूरजने अशा पद्धतीने आयुष्याचा शेवट केल्याने हळहळ व्यक्त होते आहे.

Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
girl died while removing akash kandil
आकाशकंदिल काढताना तोल गेला, ११ व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू
youth killed in bike accident in pune
बोपदेव घाटात दुचाकी घसरुन सहप्रवासी तरुणाचा मृत्यू
maharashtra vidhan sabha election 2024 tought contest in five assembly constituencies in akola district
अकोला जिल्ह्यात तुल्यबळ लढतींची रंगत; जातीय राजकारण व मतविभाजन निर्णायक ठरणार

दीड महिन्यापूर्वी सूरजचा विवाह झाला होता

सूरज निकमचा दीड महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. त्याच्या पश्चात त्याची आई, पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सूरजने गळफास घेतल्याचं त्याच्या नातेवाईकांना समजलं. त्याचे मामा भास्कर जोतीराम जाधव यांनी सूरजला रुग्णालयात आणलं होतं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. कुस्ती क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारा हा मल्ल काळाच्या पडद्याआड गेला आहे. गेल्या वर्षी झालेल्या कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याने कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकत मानाची गदा पटकवली होती.

हे पण वाचा- मुंबईत पीएचडीधारकाचा मैत्रिणीच्या घरी संशयास्पद मृत्यू; पंख्याला लटकलेल्या मृतदेहावर रक्तस्राव कसा झाला?

कोण होता सूरज निकम?

पैलवान सूरज निकम हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातल्या नागेवाडी गावातील रहिवासी आहे. त्याने कुस्तीच्या आखाड्यात भीम पराक्रम केला आहे. कुमार महाराष्ट्र केसरी हा किताबही त्याने जिंकला. विरोधी पैलवानाला कोणत्या डावावर चितपट करायचे यात त्याचा हातखंडा होता. त्याने अल्पावधीतच आपला कुस्ती क्षेत्रात दबदबा निर्माण करत कुमार केसरी होण्याचा बहुमान मिळवलेला होता. या सूरजने आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेमुळे कुस्ती क्षेत्रासह खानापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

हे पण वाचा- विवाहितेची बाळासह शेततळ्यात आत्महत्या

नेमकी घटना काय घडली?

पैलवान सूरज निकमने गळफास घेऊन त्याचं आयुष्य संपवलं. त्याच्या वडिलांचं निधन झाल्याने तो व्यथित झाला होता. शुक्रवारी म्हणजेच आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास लावून घेतला आणि आयुष्य संपवलं. सूरजच्या निधनाचं वृत्त समजताच कुस्ती क्षेत्रासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सूरजच्या निधनानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. शनिवारी दुपारी त्याचे बंधू आल्यानंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती आहे. पैलवान सूरजच्या आत्महत्येचं कारण काय? ते समजू शकलेलं नाही. पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.