राज्यासह देशाला हादरविणाऱ्या १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन आता राज्यशास्त्र विषयात एम.ए. करणार असून लवकरच तो द्विपदवीधर होणार आहे. गेल्या वर्षी त्याने इंग्रजी विषयात एम.ए. केले. याशिवाय, त्याच्यासह फाशीची शिक्षा झालेले अन्य तीन कैदी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची तयारी करीत असल्याची माहिती इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (इग्नू) नागपूर केंद्राचे संचालक पी. शिवस्वरूप यांनी दिली.
देशद्रोहासारख्या गंभीर गुन्ह्य़ात याकूब मेमनला सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेली असताना मनात फाशीचा कुठलाही विचार न आणता अभ्यासावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून मन गुंतविण्याचा प्रयत्न तो करीत आहे. हल्ली एखाद्या विषयात अनुत्तीर्ण झाल्यास किंवा अपेक्षित यश पदरात न पडल्यास विद्यार्थी आत्महत्येचा विचार करतात. मात्र, कारागृहातील हे चार कैदी फाशीची शिक्षा झालेली असताना कारागृहात राहून शिक्षणाचे धडे गिरवीत असून त्यात ते यशस्वीही होत आहेत. त्यात टायगर मेमनचा भाऊ असलेल्या याकूब मेमनचा समावेश असून सध्या तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात मृत्यूची वाट पाहात आहे. याकूबने गेल्या वर्षी इंग्रजी विषयात एम.ए. केले. त्यानंतर तो आता राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर विषयाचा अभ्यास करीत आहे. याकूबला २१ मार्च २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
राज्यशास्त्रात एम.ए. केल्यानंतर फाशीवर चढण्यापूर्वी अजून एका विषयात एम.ए. करण्याची इच्छा त्याने कारागृहातील अधिकारी आणि इग्नूकडे व्यक्त केल्याने त्याला परवानगी देण्यात आली. याकूबकडून पुस्तकांची मागणी होत असल्यामुळे ती कारागृहाच्या माध्यमातून त्याला पुरविली जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा