मंडणगड तालुक्यातील स्नेहज्योती अंध विद्यालयाला यमुनाबाई खेर पुरस्कार शिक्षणतज्ज्ञ रेणू दांडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेच्या संचालक आशा कामत आणि प्रतिभा सेनगुप्ता यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जिल्हा माहिती आधिकारी डॉ. किरण मोघे, यमुनाबाई खेर ट्रस्टचे अध्यक्ष हरिश्चंद्र गीते, सामाजिक कार्यकर्त्यां श्रद्धा कळंबटे इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. ट्रस्टतर्फे छात्रालयासह राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती गीते यांनी दिली. तसेच सवरेदय छात्रालयातील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेशही प्रदान करण्यात आले. सुभाष भडभडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Story img Loader