अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केला होता. लोकसभा निवडणुकीवेळी यशोमती ठाकूर यांनी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या, असा दावा नवनीत राणांनी केला होता. यावर यशोमती ठाकूर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राणांनी शहाणपण करत बोलायचं नाही. सिद्ध करून दाखव म्हणाव साxxx हराxxx… नाहीतर राजकारण सोडून देऊ, असं आव्हानही यशोमती ठाकूर यांनी राणांना दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवनीत राणा काय म्हणाल्या?

“लोकसभा निवडणुकीवेळी माझ्याबरोबर फिरून यशोमती ठाकूर यांनी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या. रक्ताचे आश्रू ढाळण्याचं काम ठाकूर यांनी केलं होतं,” अशी टीका नवनीत राणांनी केली होती.

हेही वाचा : “शरद पवारांना इमानदारी सिद्ध करायला सांगणाऱ्यांची लायकी काय?” जितेंद्र आव्हाडांचं धनंजय मुंडेवर टीकास्र

“नवनीत राणा चोर निघाल्या”

यावर बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, “उगच अफवा पसरवायच्या नसतात. आम्ही तुम्हाला वहिनी म्हणून स्विकारलं होतं. निवडून आणण्यासाठी दारोदार फिरलो. पण, वहिणींचं प्रमाणपत्रच खोटं निघालं. त्या स्वत:हा चोर निघाल्या.”

हेही वाचा : “विखे-पाटलांबरोबर यशोमती ठाकूरही भाजपात प्रवेश करणार होत्या, पण…”, रवी राणांचा मोठा दावा

“राणांनी शहाणपणा करत बोलायचं नाही”

“शाहाण्या म्हणावं लायकीत राहा. माझ्या बापाने आणि कुटुंबाने इथे जमिनी देण्याचं काम केलं, घेण्याचं नाही. निवडणुकीत एखादी एकर शेती विकावी लागते, हे खरं आहे. नवनीत राणा आणि रवी राणा चोxxx. शहाणपणा करत बोलायचं नाही. सिद्ध करून दाखव म्हणाव साxxx हराxxx… नाहीतर राजकारण सोडून देऊ. उगाच फालतुगिरी सहन नाही करणार,” असा हल्लाबोल यशोमती ठाकूर यांनी राणांवर केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashomati thakur reply navneet rana allegation get money ravi rana loksabha election ssa
Show comments