आम्ही सुरुवातीच्या काळात काँग्रेसला मुडद्यांची पार्टी म्हणायचो. पण आता तीच स्थिती भाजपाची झाली आहे, अशा बोचऱ्या शब्दात टीका करतानाच यापुढे राहुल गांधींना ‘पप्पू’ बोलण्यापूर्वी १० वेळा विचार करा, असा सल्ला यशवंत सिन्हा यांनी भाजपा नेत्यांना दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानमालेत बुधवारी यशवंत सिन्हा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर उपस्थित होते. सिन्हा म्हणाले, कालच्या तुलनेत आजची परिस्थिती बदलली आहे. झारखंडमधील भाजपाच्या अनेक नेत्याचे मला फोन आले. यातून भाजपाचे नेते नेतृत्वाला किती वैतागले आहेत, हे दिसून येते. गेल्या साडे चार वर्षात एका व्यक्तीलाच देवाचे स्वरुप दिले आणि तो कधी चुकू शकत नाही, असे काहींना वाटत होते. मात्र या निकालावरून भाजपामधील अहंकर मोडून निघाला आहे. तसेच देशातील नागरिकांमध्ये सरकार विरोधात तीव्र नाराजी पाहण्यास मिळत असल्याचेही या निकालातून स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानांनी संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ नतमस्तक होत आतमध्ये प्रवेश केला. ते पाहून असे वाटले की चांगले काम होईल. पण त्यातुलनेत संसदेत चांगले काम झाली नाही. सभागृह योग्य पद्धतीने चालवले जात नाही. याला जबाबदार कोण?, असा सवालही त्यांनी विचारला.

आजवरच्या राजकीय प्रवासात कोणतेही सरकार निर्णय घेताना. आपल्या मंत्र्यांना किंवा वरिष्ठांना विश्वासात घेऊन काम करायचे, मात्र या सरकारचे प्रत्येक निर्णय पंतप्रधान कार्यालयातून घेतले जातात. अन्य कोणत्याही मंत्र्याच्या कार्यालयातून निर्णय घेतले जात नाही. ज्यावेळी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा त्याची कल्पना अर्थमंत्र्यांनादेखील नव्हती. यातून या सरकारचा कारभार लक्षात येतो, असे त्यांनी नमूद केले. नोटांबदीमुळे काहीच साध्य झाले नाही. याऊलट बेरोजगारी वाढली, अशी टीका त्यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास मोदी आणि शहा कुठे असतील?, गडकरींना नेतृत्वाची संधी मिळेल का?, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आले. मोदीविरोधी पक्षनेते असतील आणि शहा अध्यक्ष राहतील. मात्र हे दोघे असल्याने नितीन गडकरी यांना संधी मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले.