काँग्रेसचे आमदार नीलेश पारवेकर यांच्या निधनामुळे येत्या २ जूनला होणाऱ्या यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीत दहा उमेदवार िरगणात उरले आहेत. एकूण सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता १० जणांमध्ये या पोटनिवडणुकीसाठी लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
चार जणांनी शनिवारी, तर शुक्रवारी दोघांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले होते. या प्रक्रियेनंतर अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. मुस्लिम वेल्फेअर पार्टीचे शेख अहमद रजा शेख हमीद आणि पुरुषोत्तम डोमाजी भजगवरे, शैलेंद्र ऊर्फ भास्कर किसन गाडेकर व संदीप अनंत देवकते या अपक्ष उमेदवारांनी शनिवारी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले. या चौघांनी उमेदवारी परत घेतल्यानंतर आता या पोटनिवडणुकीच्या िरगणात भाजपाचे मदन येरावार व काँग्रेसच्या नंदिनी पारवेकर या दोन राष्ट्रीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांसह अपक्ष उमेदवार म्हणून चच्रेत आलेले मनीष रामकृष्ण ढाले यांच्यासह एकूण दहा उमेदवार िरगणात आहेत.
उर्वरित सात उमेदवारांमध्ये प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तम भजाजी कांबळे, प्राउटिस्ट ब्लॉक इंडियाचे मधुकर विठ्ठल लालाजी धानोरकर हे उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे श्रीकांत मधुकर धोटे, माधुरी काशिनाथ अंजीकर, शेख हबीब कुरेशी, शेख वजीर आणि हरिदास दुर्योधन मेश्राम हे पाच अपक्ष उमेदवार िरगणात आहेत. विधानसभेच्या २००९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत यवतमाळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नीलेश पारवेकर व भाजपाचे मदन येरावार यांच्यामध्ये मुख्य लढत झाली होती. त्यात पारवेकर यांचा विजय झाला होता. आता येरावार यांची लढत नंदिनी पारवेकर यांच्याशी होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने अजून काँग्रेसच्या प्रचारासाठी आपला होकार दिलेला नाही. या पक्षाची तीव्र नाराजी काँग्रेससाठी अडचणीची ठरणार आहे. दुसरीकडे रिपाइंमध्येही अनेक गटतट असल्याने काँग्रेससाठी दलित व बहुजनांची मते सहज मिळतील, असे फारसे चित्र नाही. बहुजन समाज व दलित मतांवर प्रभाव टाकणाऱ्या शहरातील पाटीपुरा, अंबिकानगर व ग्रामीण भागातील दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी या वेळी आपला चेहरा म्हणून अपक्ष उमेदवार मनीष रामकृष्ण ढाले यांना िरगणात उतरवले आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक चांगलीच रंगतदार ठरण्याचे चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे.