देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभेच्या उमेदवारांनी आणि वेगवेगळ्या पक्षांनी देशभर प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. या मतदारसंघातील उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेली मुदत संपली आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या आठ जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना सोमवारी (१ एप्रिल) अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनी १२,५०० रुपयांची चिल्लर (सुट्टे पैसे/नाणी) नामनिर्देशन पत्राबरोबर निवडणूक आयोगाकडे भरली आहे. गेडाम यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यवतमाळ : लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवाराने पोतं भरून आणली चिल्लर, पैसे मोजताना कर्मचाऱ्यांची दमछाक
महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या आठ जिल्ह्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-04-2024 at 08:14 IST
TOPICSनिवडणूक आयोगElection Commissionमराठी बातम्याMarathi NewsयवतमाळYavatmalलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha ElectionवाशिमWashim
+ 1 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yavatmal candidates bring huge bag full of coins fill lok sabha nomination form rno news asc