यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील सावंगा शेतशिवारात एका अनोळखी महिलेचा मृतदेह संपूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत सापडला. यानंतर एकच खळबळ उडाली. ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं आणि या हत्येचं गुढ वाढल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं. आता या प्रकरणात मोठा खुलासा झालाय. पोलीस तपासात या महिलेचा खून तिच्या पतीनेच केल्याचं उघड झालंय. कौटूंबिक वाद आणि स्थावर मालमत्तेसाठी पतीनेच पत्नीच्या खुनाचा कट रचून हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

आरोपीची पत्नी पुणे येथे जाण्यासाठी निघाली होती. परंतु ती पुणे येथे पोहचलीच नाही. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. दरम्यान दिग्रस तालुक्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. तपासात या महिलेची ओळख पटली. तिचं नाव पुजा अनिल कावळे ( वय – २८, रा. बाई गौळ, ता. मानोरा, जि. वाशिम) असे आहे. या प्रकरणात पतीसह चौघांना अटक करण्यात आलीय.

हत्येच्या कटात कुणाचा सहभाग?

उज्वल पंढरी नगराळे (वय – २२, रा. राळेगाव), गौरव रामभाऊ राऊत (२१, रा. कळंब), अभिषेक चयन म्हात्रे (२४, रा. शिंदी बु. ता. अचलपुर जि. अमरावती) अशी या हत्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

हेही वाचा : आर्थिक वादातून प्रियकराने प्रेयसीवर केले ३० वार; प्रेयसीचा जागीच मृत्यू

यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ म्हणाले, “महिलेच्या पतीनेच तिच्या हत्येचा कट रचला. १० नोव्हेंबरला ही महिला हरवल्याची तक्रार आली होती. तपास सुरू असतानाच या महिलेचा मृतदेह आढळला. यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करत ७२ तासात आरोपींना बेड्या ठोकल्या.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yavatmal police arrested 4 accused including husband for murder of wife pbs