यवतमाळमधील आर्णी येथील विठ्ठल मंदिर परिसरात बुधवारी दुर्मीळ खवल्या मांजर आढळले. ही माहिती वनविभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने हे खवल्या मांजर बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेतले होते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
त्यानंतर आज गुरुवारी सकाळी या मांजरास आर्णी नजीकच्या जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यात आले. खवल्या मांजरास ताब्यात घेण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी रोडगे, वनरक्षक निलेश चव्हाण, एम. के. जाधव, अमोल श्रीनाथ, प्रफुल कोल्हे, दिपक सपकाळे आदिंनी विशेष प्रयत्न केले.
खवल्या मांजर हा दुर्मीळ वन्यजीव असून याची तस्करी सुध्दा करण्यात येते. या खवल्या मांजरची किंमत लाखो रुपयात असते, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रोडगे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
First published on: 18-06-2020 at 13:11 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yavatmal rare pangolin found at arni msr