यवतमाळ जिल्हा परिषदेतील विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका फोडणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेली प्रत, तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडील उत्तरपत्रिकेची प्रत तपासून प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी ही माहिती दिली.
या गंभीर गुन्हय़ातील आरोपींवर गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांचे लक्ष होते. विक्रीकर निरीक्षक मकरंद मारुती खामणकर यांच्याकडून सर्व पदांसाठीची उत्तरपत्रिका पोलिसांना मिळाली. त्यामुळे या प्रकरणात काही बडे मासे हाती लागण्याची शक्यता आहे. सूत्रधार खामणकर याचे यवतमाळमध्ये कोणाशी संबंध होते, त्याला कोणी उत्तरपत्रिका पुरवली या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यवतमाळला जाणार आहेत. विविध पदांसाठी परीक्षा देणारे मात्र पुरते घाबरले आहेत.
दरम्यान, ही परीक्षाच रद्द होऊ शकते काय याचा निर्णय करण्यासाठी ती उत्तरपत्रिका तपासावी लागेल. त्यानंतर यंत्रणेत कोठे दोष आहेत हे शोधू, असे यवतमाळचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले अटक करण्यात आलेले आरोपी दलालीचे काम करीत होते. उत्तरपत्रिका घेणारा शोधायचा, व्यवहार ठरवायचा व सूत्रधार खामणकपर्यंत न्यायचे, अशी कामाची पद्धत होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा