Year Ender 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच बदल झाल्याचं २०२४ या वर्षात दिसून आलं. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक अशा दोन्ही निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. या वर्षभरात घडलेल्या पाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आपण जाणून घेऊ.

राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा शरद पवार आणि उद्धव ठाकरे गैरहजर

अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला तो २२ जानेवारी २०२४ या दिवशी. महाराष्ट्रातले भाजपाचे दिग्गज नेते, साधू संत त्याचप्रमाणे कलावंत यांनी सगळ्यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. अपवाद ठरला तो शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा. उद्धव ठाकरेंनी ज्या दिवशी राम मंदिरातील मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होता त्या दिवशी नाशिकच्या काळा राम मंदिरात जाऊन आरती केली तसंच नंतर गोदावरीच्या आरतीतही सहभाग नोंदवला. तर शरद पवार यांनी कुठल्याही मंदिरात जाऊन दर्शन घेतलं नाही. त्यामुळे हा मुद्दा चर्चेत राहिला. काँग्रेसच्याही नेत्यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार घातल्याचं दिसून आलं.

Devendra Fadnavis At Loksatta Varshavedh
Loksatta Varshavedh : ‘वर्षवेध’ मध्ये २०२४ चा परिपूर्ण माहितीकोश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Devendra Fadnavis
Maharashtra News: वर्षा बंगला पाडणार का? देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर, म्हणाले…
Cm Devendra Fadnavis in loksatta events
‘वर्षवेध’चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन; स्पर्धा परीक्षांचा ‘वाटाड्या’ पूर्णपणे नव्या स्वरूपात
Maharashtra Kesari 2025
Maharashtra Kesari 2025 : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी; सोलापूरचा महेंद्र गायकवाड पराभूत
Axis Focused Fund performance
ॲक्सिस फोकस्ड फंडाची कामगिरी कशी?
budget 2025 share market
Budget 2025 – …तर गुंतवणुकदरांनी कोणता विचार करावा?
Devendra Fadnavis On Sarpanch Santosh Deshmukh Case
Budget 2025: ‘भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड ठरणारा अर्थसंकल्प’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे केले कौतुक

शरद पवारांच्या पक्षाला नवं नाव आणि चिन्ह

अजित पवारांनी जुलै २०२३ मध्ये बंड पुकारुन त्यानंतर सत्तेत जाणं पसंत केलं. या बंडानंतर निवडणूक आयोगाने शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांकडे देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २२ फेब्रुवारी २०२४ या दिवशी निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तुतारी वाजवणारा माणूस हे नवं चिन्ह दिलं. या नव्या चिन्हासह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची नव्याने मोर्चेबांधणी अन् राजकीय वाटचाल सुरु झाली. लोकसभा निवडणुकीची तयारी त्यांनी यासह सुरु केली.

लोकसभा निवडणुकीची घोषणा

१६ मार्च २०२४ या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत देशातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांमध्ये १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे पाच टप्प्यात मतदान झाले. निवडणुकीत जागा वाटपावरुन महाविकास आघाडीसह महायुतीत जोरदार कलह पाहायला मिळाला. तसंच महाविकास आघाडीतही काही जागांवरुन रस्सीखेच पाहण्यास मिळाली. या निवडणुकीतली चर्चेतली लढत ठरली ती बारामतीची. कारण बारामतीत महायुतीच्या उमेदवार या सुनेत्रा पवार होत्या तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे होत्या. या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र सुप्रिया सुळे या निवडणुकीत जिंकल्या.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरशी

४ जून २०२४ या दिवशी देशाच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत ४०० पारचा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला. सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यात भाजपला यश आलं मात्र या निवडणुकीने इंडिया आघाडीलाही बळ दिले. महाराष्ट्रामध्ये लोकसभेत सर्वात धक्कादायक निकाल लागले. राज्यात एकतर्फी होईल असं चित्र दिसत असलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने ३१ जागा जिंकल्या तर महायुतीला अवघ्या १७ जागा जिंकता आल्या. राधाकृष्ण विखे पाटील, रावसाहेब दानवे, भारती पवार, पंकजा मुंडे अशा दिग्गजांच्या साम्राज्याला निवडणुकीत हादरा बसला. तर एकनाथ शिदेंनी या निवडणुकीत उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त जागा मिळवून दाखवल्या. अनपेक्षित निकाल हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य ठरलं.

हे पण वाचा- संघर्षाचा आवज कधी ऐकलाय का? नवऱ्याच्या गरीबीत साथ देणाऱ्या ‘या’ महिलेचा VIDEO एकदा पाहाच

बाबा सिद्दीकींची हत्या, संपूर्ण देश हादरला

१२ ऑक्टोबरला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेने सगळा देश हादरला. मुंबईतल्या वांद्रे भागात ही घटना घडली. या भयंकर घटनेने राजकीय वर्तुळासह हिंदी सिनेसृष्टीही हादरुन केली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर कुख्यात डॉन लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारत सलमान खानला मदत करत असल्यामुळे हे कृत्य केल्याची कबुली दिली. या हत्येप्रकरणी तीन जणांना तातडीने अटक करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीत महायुतीची त्सुनामी

लोकसभा निवडणुकीनंतर आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली होती. दुसरीकडे महायुतीकडून अर्थसंकल्पात आणलेल्या लाडकी बहीण योजनेचा दणक्यात प्रचार सुरु होता. राज्यात सत्ता बदलाचा दावा करत महाविकास आघाडीमध्ये अगदी मुख्यमंत्रीपदावरुन हाणामाऱ्याही झाल्या, मात्र २३ नोव्हेंबरला लागलेल्या निकालाने सर्वांनाच धक्का दिला.महायुतीच्या प्रचंड लाटेत महाविकास आघाडीची अक्षरश:धुळधाण झाली. या निवडणुकीत महायुतीने तब्बल २३२ जागा मिळवत इतिहास रचला. यामध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक १३२ ,शिवसेना शिंदे गटाने ५७ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकल्या. दुसरीकडे मविआला फक्त ४६ जागा जिंकता आल्या. देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या प्रमुख घटनांचा आढावा घेतला तर लक्षात येतं की हे वर्ष राजकीय घडामोडींचं ठरलं.

Story img Loader