अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही सरकारमध्ये जायचं ठरवलं तेव्हा काय काय गोष्टींना, कायदेशीर बाबींना सामोरं जायचं त्याची चर्चा करुनच निर्णय घेतला. सगळ्या कायदे तज्ज्ञांनी आम्हाला सांगितलं की या मार्गाने गेलं तर अपात्रतेचा निर्णय होणार नाही. दोन ते चार कायदे तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर आम्हाला विश्वास बसला त्यानंतरच आम्ही सरकारमध्ये जाण्याची पावलं उचलली आहेत असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

होय, अजित पवारच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष

आम्ही सरकारमध्ये सहभागी होण्याच्या आधी निवडणूक आयोगाकडे कागदपत्रं पाठवली आहेत. अजित पवारांनाच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही मान्यता दिली आहे ते आता तुम्हाला कळलंच आहे. अजित पवार हेच पक्षाचे प्रमुख आहेत आणि यापुढेही राहतील असंही त्यामध्ये आम्ही नमूद केलं आहे असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं. पक्षाची घटना, प्रचलित राजकीय पक्षांविषयीचे निवडणूक आयोगाकडे असलेले नियम यानुसारच ही मांडणी करण्यात आली आहे. अजित पवारच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील.

जितेंद्र आव्हाड आमचे चांगले मित्र आहेत. त्यांचं आमच्यावर प्रेम दिसणं स्वाभाविक आहे. माझ्यावरच नाही त्यांचं सगळ्यांवर प्रेम आहे. पण असल्या प्रेमामुळेच ज्या काही घटना घडल्या त्या झाल्या नसत्या असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांच्या त्या दाव्यावर उत्तर

शरद पवारांना समजवण्याचा प्रयत्न आम्ही शेवपर्यंत केला. सुप्रिया सुळे या देखील तिथे होत्या. जयंत पाटील यांच्याशीही आम्ही महिन्यापूर्वी चर्चा केली. बुधवारी अजित पवारांनी भाषणात अनेक गोष्टी उघड केल्या होत्या. आम्ही शेवटपर्यंत मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले मात्र शरद पवार यांनी ऐकलं नाही असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर शरद पवार यांनी सातत्याने भाजपाशी चर्चा करुन शब्द फिरवला असंही वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे. दोन ते चार लोकांना घेऊनच पक्ष चालवू लागले तर लोक वाट शोधतात तेच राष्ट्रवादी पक्षातच झालं आहे.

शरद पवार यांचा फोटो ठेवलाच पाहिजे. त्यांचा मान आहे तो मान राखला गेलाच पाहिजे. साहेबांनी जरी सांगितलं की माझा फोटो वापरायचा नाही तर त्यावर अजित पवार आणि इतर नेते आमदार आहेत ते बसतील आणि निर्णय घेतील. असंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yes ajit pawar as national president of ncp in we mention it in election commission application said chhagan bhujbal scj
Show comments