योगेश अलेकरी नवी मुंबईत राहणारा हा तरुण एक बाईक राईडर आणि गिर्यारोहक आहे. सध्या योगेश चर्चेत आहे तो त्याच्या मुंबई-लंडनच्या प्रवासामुळे. हा प्रवास त्याने चक्क बाईकवरून केला आहे. योगेशने २७ देश, दोन खंड आणि तब्बल २९००० कि.मी असा मुंबई-लंडन-मुंबई प्रवास १३६ दिवसांत यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाईकने एकट्याने इतक्या लांबीचा प्रवास करणारा तो भारतातील तिसरा व्यक्ती असल्याचा दावा त्याने केला आहे. जगभ्रमंतीची आवड आणि वसुधैव कुटुंबकम हा संदेश घेऊन योगेश या प्रवासासाठी निघाला होता. त्याआधी तीन वर्ष त्याने या प्रवासचं नियोजनही केलं होतं. थक्क करणाऱ्या या प्रवासातील आपला अनुभव योगेशने गोष्ट असामान्यांचीमध्ये सांगितला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogesh alekari a bike rider who traveled 29000km from mumbai to london on bike pck