लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : मुस्लिमांचे लाड करणारी काँग्रेस या निवडणुकीत इतिहास बनेल अशी खरमरीत टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी सांगली येथे भाजपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महाविजय सभेत केली.
सांगलीतील चिंतामण महाविद्यालयाच्या मैदानावर खा. संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे, नीता केळकर, शेखर इनामदार,भाजपचे जिल्हाध्यक्ष निशीकांत पाटील, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आदींसह भाजप व मित्र पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन भारत तयार होत आहे. श्रघ्देचा सन्मान, सुरक्षा, विकास आणि गरीब कल्याण ही मोदींची गॅरंटी आहे. आता भारत कोणाला जाणीवपूर्वक डिवचत नाही आणि डिवचल तर सोडणारही नाही.
आणखी वाचा-साताऱ्यात गुलमोहर दिन साजरा
मोदींनी लाभार्थ्यांना असलेले अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रथा सुरू करून काँग्रेसची कमिशनखोरी बंद पाडली आहे. अयोध्येत श्रीराम लल्लाचे मंदिर उभा करून आम्ही आमच्या आस्था जपण्याचे काम केले असून आग्रा येथे भव्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे संग्रहालय उभे करण्यात येत आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवा भारत तयार झाला असून आमच्याकडे आता कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही.
काँग्रेससह इंडिया आघाडीने जाहीरनाम्यात गोमांस खाण्याला मान्यता देण्याचे आश्वासन दिले आहे. हे पाप आपण कदापि सहन करणार नाही, कारण आमची गोमातेबद्दल निस्सिम श्रध्दा आहे. राहूल गांधी देशात संकट आले की, इटलीला जातात. करोनाच्या संकटावेळी ते परदेशात गेले होते. अशा माणसाच्या हाती देशाची सूत्रे स्वाभिमानी जनता कधीच देणार नाही.
आणखी वाचा-पर्यटकांसाठी महाबळेश्वरच्या वेण्णा लेकमध्ये आकर्षक बोटी, उन्हाळी हंगामासाठी प्रशासन सज्ज
काँग्रेस जातीआधारित जनगणनेद्वारे समाजात फूट पाडून ओबीसीच्या २७ टक्के आरक्षणवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करत आहे. ओबीसीमधील सहा टक्के आरक्षण मुस्लिमांना देण्याचा प्रयत्न असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही धार्मिक आरक्षणाला विरोध केला आहे. यामुळे काँग्रेसची भूमिका ही डॉ. आंबेडकर यांचा अवमान करणारी आहे. सांगलीशी नाते सांगताना त्यांनी शिराळा येथील गोरक्षनाथ मठाचा उल्लेख आवर्जून केला. या ठिकाणी आमचे महंत असून वेळोवेळी विशेषत: नागपंचमीवेळी मी या ठिकाणी भेट दिली असल्याचे त्यांनी सांगितले.