मागील दोन-तीन दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये निधी वाटपावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही निधी वाटपावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल केला.

दरम्यान, यावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यात विधानसभेच्या सभागृहात कलगीतुरा रंगला. सभागृहातील खडाजंगीनंतर यशोमती ठाकूर यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला. “तुम्ही महाराष्ट्राची घाण करत आहात, हे नक्की”, अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”

खरं तर, विधानसभेत निधी वाटपावरून विरोधकांनी आरोप केल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. “निधी वाटप करताना कोणताही भेदभाव केला नाही. २०१९, २०२० आणि २०२१ या काळात निधीवाटपाबद्दल जे साधारण सूत्र होतं. तेच सूत्र आम्ही पुढे कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये फारसा काही बदल केला नाही,” असं उत्तर अजित पवारांनी दिलं. अजित पवारांच्या या उत्तरावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर जोरदार आक्षेप नोंदवला.

हेही वाचा- “महिलांना दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या जातायत, त्यांच्यावर बलात्कार…”, मणिपूर हिंसाचारावर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया

यशोमती ठाकूर यांच्या आक्षेपानंतर अजित पवार म्हणाले, “यशोमतीताई, तुम्ही माझ्या भगिनींसारख्या आहात. माझं ऐकून घ्या. माझं ऐकून घेतल्यानंतर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. भावाच्या नात्याने तुम्हाला ओवाळणी देतो. काळजी करू नका.” यावर यशोमती ठाकूर म्हणाल्या, “तुम्ही १५ दिवसांतच सावत्र भावासारखं वागायला लागलात.” यानंतर अजित पवार म्हणाले, “तुम्ही चष्मा बदला, सावत्र भावाप्रमाणे माझ्याकडे बघू नका. मी सावत्र बहीण म्हणून तुमच्याकडे बघत नाही.”

हेही वाचा- “१५ दिवसांत सावत्र भावासारखे वागायला लागलात”, निधीवाटपावरून अजित पवार-यशोमती ठाकूर यांच्यात कलगीतुरा!

विधानसभा सभागृहात अजित पवारांबरोबर झालेल्या खडाजंगीनंतर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. विधानभवनाबाहेर ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना अजित पवारांना उद्देशून यशोमती ठाकूर म्हणाल्या, “तुम्ही माझा भाऊ आहे, असं मला वाटत होतं. पण आता भाऊ १५ दिवसांत सावत्र भावासारखा वागायला लागला, तर कसं चालेल. महाराष्ट्राला ते शोभत नाहीये. तुम्ही महाराष्ट्राची घाण करताय, हे नक्की.”

Story img Loader