“आमदार बच्‍चू कडू हे आमचे मोठे बंधू आहेत. पण, तोडीबाज म्‍हणून त्‍यांची ओळख आहे. त्‍यांच्‍या मालमत्‍तेची माहिती आपल्‍याकडे आहे. त्‍यांनी आमच्‍या विरोधात राजकारण करू नये, इथे रवी राणांसोबत गाठ आहे”, असा इशारा आमदार रवी राणा यांनी जाहीर सभेत बोलताना दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावर बच्चू कडू यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बच्चू कडू म्हणाले, “हात जोडून माफी मागत होते, विनंती करत होते, तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात म्हणत होतात. आज त्याच भावाला पैसे खातो म्हणता. सरडा तरी वेळाने रंग बदलतो. ?आता लगेच यावरून लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा आमच्याबरोबर असा वागतो मग सामान्य लोकांबरोबर कसं वागणार? हरलेल्या मानसिकतेतून त्यांचं हे वाक्य आलं आहे. हार नक्की आहे. जे काही आज येत आहे, तुम्ही रॅलीतील अर्धे मते आम्हालाच मिळणार आहेत. ते कसे गेले, का गेले हे आम्हाला माहितेय.”

“सभा मोठ्या होईल कदाचित, पण मत अर्धेही राहणार नाहीत. मतदाताच नाही. ही संपलेली गोष्ट आहे. आनंदराव आंबेडक यांच्या क्रमाकांच्याही खाली जाऊन बसतील. नवनीत राणा चौथ्या क्रमाकांवर राहतील, असं ते म्हणाले.

हेही वाचा >> “तोडीबाज म्‍हणून बच्चू कडूंची ओळख, त्‍यांनी…”, आमदार रवी राणा यांचा इशारा

“रवी राणा यांच्या एवढा लाचार माणूस हिंदुस्थानात पाहिला नाही. ते मोठा भाऊही म्हणतात आणि माफीही मागतात. त्यांनी भाजपा, राष्ट्रवादीबरोबर सेटलमेंट केली. विधानसभेसाठी सेटलमेंट केली. मला त्यांचे काळे धंदे बाहेर काढायला लावू नका. त्यांची जुनी सवय आहे. नसलेल्या, उखरून काढलेल्या, अस्तित्वात नसलेल्या गोष्टी काढून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी आम्ही छाती फाडून तयार आहोत”, अशी टीकाही बच्चू कडू यांनी केली.

निवडणुकीत रडणं चांगलं नाही

“जनतेच्या न्यायालयात नवनीत राणा हरणार आहेत. रडणं म्हणजे सहानुभूती घेण्यासारखं आहे. कितीवेळा रडणार आहात? निवडणुकीत रडणं चांगलं नसतं. सामान्य लोकांसाठी रडला असता तर आम्हाला किव वाटली असती”, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You say big brother you even ask for forgiveness you are such a helpless person bachu kadus harsh criticism of ravi rana sgk