राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या बेधडकपणे बोलण्याच्या शैलीसाठी ओळखले जातात. असाच काहीसा प्रकार शनिवारी बारामतीमध्ये पाहायला मिळाला. बारामतीमधल्या नियोजित कार्यक्रमांना अजित पवारांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमावेळी त्यांनी खरेदी विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांना अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना सूचना देताना फटकारले आहे. तुम्ही मला कसलीही कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा, असं अजित पवार पदाधिकाऱ्यासह अधिकाऱ्यांना म्हणाले.

यावेळी पेट्रोल पंपाच्या परवानगीच्या कामात उशीर होत असल्याबद्दल कारण सांगण्यात आलं. यावेळी अजित पवारांनी मला कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा. दिवाळीपूर्वी कामे पूर्ण करा, लागेल तिथे सहकार्य करु, अशा सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. “सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता इथे आहे. तुम्ही ना काही जणं माझ्या गतीनं कामं करा म्हणजे कामं होतील. ही काय पद्धत झाली? अधिकाऱ्यांना भेटा,” असे अजित पवारांनी म्हटले आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
social security schemes are not free gifts jharkhand speaker mahato
उद्योगपतींना पायघड्या घालताना ‘रेवडी’चा विषय नाही
Karnataka BJP leadership feud intensifies with anti-Yediyurappa camp proposing a new name for state unit chief.
“…तर कर्नाटकात दहा जागाही मिळणार नाहीत”, कर्नाटक भाजपामध्ये पेटला अंतर्गत वाद; प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती

माझी स्वतःची गाडी पेट्रोल भरायला आली तरी बिल द्यायचं

“माझी व्यवस्थापकीय संचालकांना विनंती आहे की, माझी स्वतःची गाडी जरी पेट्रोल डिझेल भरायला आली तरी बिल द्यायचं उधारी घ्यायची नाही. काहीही घ्यायला आलं तरी अजिबात उधारीचा धंदा नकोय आपल्याला,” अशी सूचना अजित पवार यांनी केली आहे.

जिल्हा बँक चालवण्याचे अधिकार केंद्र सरकारने जवळपास काढून घेतले

यावेळी बोलताना जिल्हा बँक चालवण्याचा अधिकार केंद्र सरकारने जवळपास काढून घेतला असे अजित पवारांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने जिल्हा सहकारी बँकेवर निर्बंध घातले आहेत. त्याच्या विरोधात राज्य सरकार कोर्टात जाणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. केंद्र सरकारने बरेच नविन बदल केले आहेत. त्याकरता आम्ही कोर्टात जाणार आहोत. बॅंक चालवण्याचा जिल्ह्याचा अधिकार जवळपास काढून घेतला आहे. आम्ही चांगल्या पद्धतीने बँक चालवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या पाच बँकांमध्ये सातारा आणि पुणे जिल्हा बँक यांचा समावेश होतो. पण तरीदेखील सहकारी बँकामधील अर्थव्यवस्था स्वतःच्या ताब्यात यावी अशा प्रकारचा केंद्राचा प्रयत्न चाललेला आहे. त्याच्या विरोधात आम्ही चांगल्या वकिलाचा सल्ला घेऊन सहकार विभागाच्या वतीने पुढं कसं जायच याचा विचार करीत आहोत, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Story img Loader