प्रातर्वधिीसाठी भल्या पहाटेच घरून गेलेल्या २१ वर्षीय तरुणीचा विवस्त्र मृतदेह खुनी नदीच्या पात्रात आढळून आल्याने केळापूर परिसरात खळबळ निर्माण झाली.
पांढरकवडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाटणबोरी येथील इंदिरा नगरात राहणारी योगीता सिडाम नावाची तरुणी पहाटे ५ वाजता प्रातर्वधिीसाठी घरून बाहेर पडली. पण ती ११ वाजेपर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबातील सारे जण चिंताग्रस्त होऊन तिचा शोध घेऊ लागले असता योगीताचा निर्वस्त्र मृतदेह तिच्या घरापासून सहाशे मीटर अंतरावरील खुनी नदीच्या पात्रात आढळून आल्याने तिच्या कुटुंबातील लोकांना धक्का बसला. योगीताचा विवाह ३० एप्रिलला होणार होता.
घटनास्थळी युवतीचे कपडे जळालेल्या अवस्थेत दिसून आले. नदीच्या पात्राजवळील दगडावर रक्त सुध्दा सांडलेले आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी योगीताचे वडील नागोराव सिडाम यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबाबत तर्कवितर्क लावल्या जात असून योगीताचा मृत्यू कशाने झाला, तिच्यावर अत्याचार करून, तिला ठार मारून मृतदेह नदीच्या पात्रात फेकला की काय इत्यादी प्रश्नांची उत्तरे उत्तरीय तपासणी अहवालानंतरच मिळूू शकतील.
या घटनेने अवाक् झालेल्या नागरिकांची सुध्दा घटनास्थळी गर्दी झाली. घटनेचे वृत्त समजताच पांढरकवडा पोलीस ठाण्याचे उपविभागीय अधिकारी भालचंद्र महाजन आणि ठाणेदारसह घटनास्थळी जाऊन योगीताचे शव ताब्यात घेऊ उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2015 रोजी प्रकाशित
तरुणीचा मृतदेह खुनी नदीपात्रात आढळला
प्रातर्वधिीसाठी भल्या पहाटेच घरून गेलेल्या २१ वर्षीय तरुणीचा विवस्त्र मृतदेह खुनी नदीच्या पात्रात आढळून आल्याने केळापूर परिसरात खळबळ निर्माण झाली.
First published on: 01-04-2015 at 07:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young girl murdered in yavatmal