मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे हे मागील नऊ दिवसांपासून जालन्यात उपोषण करत आहेत. त्यांनी जवळपास दहा दिवसांपासून त्यांनी अन्नाचा कणही खाल्ला नाही. त्यांना सध्या आंदोलनस्थळीच सलाईन लावण्यात आली आहे. त्यांची प्रकृती हळुहळू ढासळताना दिसत आहे.दरम्यान, विविध राजकीय पक्षांचे नेते आंतरवली सराटी येथे जाऊन आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेत आहे.
मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार, बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीत ज्यांच्याकडे महसुली, शैक्षणिक आणि निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी दाखले देणार, असल्याची घोषणा सरकारने केली आहे. सरकारच्या या घोषणेनंतरही मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं नाही. सरकारने आपल्या जीआरमध्ये बदल करावा आणि सरसकट मराठा समुदायाला कुणबी दाखले द्यावेत, अशी मागणी जरांगे यांनी केली.
हेही वाचा- “…तर ते उपोषण सोडायला तयार”, मनोज जरांगेंच्या पत्नीची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “बारा वाजेपर्यंत…”
दरम्यान, मरोज जरांगे यांना समर्थन देण्यासाठी आलेल्या तरुणीने सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यास सरकारला इतका वेळ का लागत आहे? असा सवाल संबंधित तरुणीने विचारला आहे. ‘मुंबई तक’शी बोलताना तिने ही प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा- “…ही सर्व नौटंकी आहे”, मनोज जरांगे यांच्याशी सुरू असलेल्या राजकीय भेटीवर प्रकाश आंबेडकरांचं विधान
मनोज जरांगे यांच्या समर्थनासाठी आलेली तरुणी म्हणाले, “एका रात्रीत जर सरकार बदलू शकत असतील, तर आरक्षण देणं खूप मोठी गोष्ट नाही. ईडब्ल्यूएसला (आर्थिकदृष्ट्या मागासलेला घटक) जेव्हा १० टक्के आरक्षण दिलं, तेव्हा ते एका तासात दिलं होतं. मग आता एवढा वेळ का लागतोय? असा आमचा प्रश्न आहे. मनोज जरांगे यांना उपोषणाला बसून आठ-दहा दिवस झाले आहेत, तरीही सरकार कोणताही निर्णय घेत नाही. हे सरकारच्या लक्षात येत नाही का?”