सांगलीत घरफोडी करून चोरीचे दागिने विक्री करण्याच्या प्रयत्नात असताना एका तरूणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक करून १२ लाख ७३ हजाराचे चोरीचा ऐवज हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी बुधवारी दिली. पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी चोरीचे प्रकार रोखण्यासाठी आणि सराईत गुन्हेगारावर कडक नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा >>> दहावी, बारावीच्या परीक्षा बहिष्कारावर शिक्षण संस्था संचालक ठाम, म्हणतात…

Action taken against constable who asked for bribe to help accused
आरोपीला मदत करण्यासाठी लाच मागणाऱ्या हवालदारावर कारवाई
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
suraj Chavan
खिचडी घोटाळा प्रकरण : सूरज चव्हाण यांचे अटकेला आणि ईडी कोठडीला आव्हान, उच्च न्यायालयाची प्रतिवाद्यांना नोटीस
goon Sajjan Jadhav
पुणे: पिस्तूल बाळगणारा गुंड अटकेत, गुलटेकडीत गुन्हे शाखेची कारवाई
businessman targeted by cybercriminals and his friend attempted to extort ₹25 lakhs
खंडणीसाठी मित्राने पातळी सोडली, झाले असे की …
baba Siddique murder
मारेकऱ्यांचा बाबा सिद्दिकी यांना कार्यालयाजवळच मारण्याचा कट, आरोपींच्या चौकशीतून माहिती उघड; आतापर्यंत ५ लाख रुपयांच्या व्यवहारांची माहिती
Salman Khans Panvel farmhouse surveillance case accused arrested from Haryana
अभिनेता सलमान खानच्या पनवेलच्या शेत घराबाहेरील टेहळणी प्रकरणातील आरोपीला हरियाणातून अटक
Mokka Justice Amit Shete acquitted four criminals from mokka charges for not provided strong evidence
कल्याणमधील आंबिवलीतील सराईत गुन्हेगारांची न्यायालयाच्या आदेशावरून मोक्कामधून मुक्तता

यानुसार निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथक  कार्यरत होते. या पथकातील बिरोबा नरळे या कर्मचार्‍याला सराईत गुन्हेगार स्वप्नील मोहन तरसे (वय ३१ , रा बुधगाव) हा उद्योग भवन परिसरात चोरीचा माल विक्री करण्यास येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे या ठिकाणी सापळा लावला होता. संशयित तरसे आल्यानंतर ताब्यात घेउन झडती घेतली असता  २१०  ग्रॅम  वजनाचे सोन्याचे दागिने आणि ४३२  ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा १२  लाख ७२  हजार  १४० रूपयांचा ऐवज मिळाला. त्यांने विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन तर संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक ठिकाणी घरफोडी करून या दागिन्याची चोरी केल्याची कबुली दिली आहे.