सांगलीत घरफोडी करून चोरीचे दागिने विक्री करण्याच्या प्रयत्नात असताना एका तरूणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक करून १२ लाख ७३ हजाराचे चोरीचा ऐवज हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी बुधवारी दिली. पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी चोरीचे प्रकार रोखण्यासाठी आणि सराईत गुन्हेगारावर कडक नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> दहावी, बारावीच्या परीक्षा बहिष्कारावर शिक्षण संस्था संचालक ठाम, म्हणतात…

यानुसार निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथक  कार्यरत होते. या पथकातील बिरोबा नरळे या कर्मचार्‍याला सराईत गुन्हेगार स्वप्नील मोहन तरसे (वय ३१ , रा बुधगाव) हा उद्योग भवन परिसरात चोरीचा माल विक्री करण्यास येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे या ठिकाणी सापळा लावला होता. संशयित तरसे आल्यानंतर ताब्यात घेउन झडती घेतली असता  २१०  ग्रॅम  वजनाचे सोन्याचे दागिने आणि ४३२  ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा १२  लाख ७२  हजार  १४० रूपयांचा ऐवज मिळाला. त्यांने विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन तर संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक ठिकाणी घरफोडी करून या दागिन्याची चोरी केल्याची कबुली दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth arrested by local crime branch team while trying to sell stolen jewellery from house zws