रत्नागिरी: शहराजवळील डी मार्ट येथील रेल्वे पुलावरून  तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १५ ऑगस्टला सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. आत्महत्या करणारा तरुण शहरामधील मुरुगवाडा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव सुरेंद्र राजेंद्र किर (वय ३८ रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) असे आहे.या घटनेची माहिती मिळताच तातडीने ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक निखारर्गे,  शिवगण, हवालदार मंदार मोहिते, हवालदार रुपेश भिसे, हवालदार रोशन सुर्वे, अजय कांबळे आदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मृतुदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने पोलीसांकडून मृतदेहाचे तुकडे गोळा करावे लागत आहे.

सुरेंद्रला दारुचे व्यसन होते. सुरेंद्र हा दुपारच्या सुमारास आत्महत्या करण्याच्या हेतूने शहरातील कुवारबाव येथील डी मार्टच्या जवळ असणाऱ्या रेल्वे पुलावर आला. तिथून त्याने बहिणीला फोन लावून मी आत्महत्या करणार असल्याची कल्पना दिली होती. पुलावर येऊन त्याने थेट पुलावरून जाणाऱ्या रेल्वे गाडीवर उडी घेत आत्महत्या केली. मृतदेहाचे अक्षरशः तुकडे झाले. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांना माहिती मिळताच तातडीने पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

Suicide student Nagpur, Suicide of 12th student,
अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Representative Image
“मी अभ्यास करू शकत नाही, हे माझ्या आवाक्याबाहेर…” कोटामध्ये IIT प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
Delisa Perera
वसईतील डॉक्टर डेलिसा परेरा यांची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक
due to torture of wife and in laws youth committed suicide
पत्नीच्या छळामुळे तरुणाची आत्महत्या, पत्नी,सासूसह मेहुणीविरुद्ध गुन्हा दाखल
Nagpur,couple made video before committing suicide on their wedding anniversary
नागपूर : लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्याची आत्महत्या, अपत्य होत नसल्यामुळे…
passenger beaten to death on dakshin express
धावत्या दक्षिण एक्स्प्रेसमधील थरार , प्रवाशाचा खून
Man dies by suicide after harassment over repayment of loan
कर्ज वसुली एजंटच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या
Story img Loader