कराड : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या विधानसभेच्या कसबा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीसाठी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी केली आहे. महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची करत मोठी प्रचारयंत्रणा कार्यरत केली आहे. या निवडणुक प्रचारासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत केली असून युवक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते हे प्रत्यक्ष उमेदवारासोबत प्रचार करणार आहेत.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराडमधील कार्यालयातून याबाबत प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, शिवराज मोरे  यांच्या नेतृत्वाखालील समितीमध्ये दीपाली ससाणे (प्रदेश महासचिव), अक्षय जैन (प्रदेश महासचिव), प्रथमेश अबनावे (प्रदेश महासचिव), राहुल शिरसाट (पुणे शहर अध्यक्ष), ऋषिकेश वीरकर (कसबा पेठ विधानसभा अध्यक्ष) आदी सक्रियपणे काम पाहणार आहेत.

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
dcm devendra fadnavis praise obc community
भाजपच ओबीसींच्या पाठीशी!, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !

युवक काँग्रेसच्या समितीने कसबा पेठ मतदार संघात मतदान केंद्रनिहाय नियोजन करून “घर टू घर” प्रचारावर भर दिला आहे. तसेच कोपरा सभा, मिरवणुका यांचे नेटके नियोजन केलेले आहे. मतदान केंद्रनिहाय समाजमाध्यम समुह (सोशल मीडिया )  करून प्रचार केला जात आहे. तसेच पदयात्रा व जाहीर सभा यांचे उमेदवारांसोबत प्रत्यक्ष नियोजन केले गेले आहे. स्वतः उमेदवार रवींद्र धंगेकर हे आपल्या यंत्रणेमार्फत प्रचार करीत आहेत. यामुळे महाविकास आघाडी नक्कीच प्रचारात आघाडी घेवून आहेत. रवींद्र धंगेकर निवडून येतील असा विश्वास शिवराज मोरे यांनी व्यक्त केला.