सोलापुरमध्ये काल(शुक्रवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद उफाळल्याचे पाहायला मिळाले. एवढच नाही तर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंद कार्यालसमोर उभा राहून आमदार प्रणिती शिंदे यांचे पोस्टर झळकवत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली.

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रणिती शिंदे अंगार है बाकी सब भंगार है, प्रणितीताई आप आगे बढो हम तुम्हारे साथ है.. अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोस्टर आंदोलनाला काँग्रेस पक्षाच्या युवक कार्यकर्त्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं.

Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Dhavalsingh Mohite Patil resigned as district president due to Sushilkumar and Praniti Shindes arbitrariness
सोलापुरात काँग्रेस पक्ष नसून शिंदे काँग्रेस; धवलसिंह मोहिते यांचा आरोप करीत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
amshya padawi
शपथविधीदरम्यान शिंदेंच्या आमदाराचा गोंधळ, एकही शब्द व्यवस्थित वाचता येईना!
devendra fadnavis takes oath as chief minister of maharashtra for the third time
तीन ताल… फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी; शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, पवारांचा सहावा विक्रमी शपथविधी
eknath shinde took oath as deputy cm with ajit pawar and devendra fadnavis cm
Eknath Shinde: शपथविधीच्या दोन तास आधी एकनाथ शिंदे झाले राजी; पडद्यामागे नेमकं असं काय घडलं?

हेही वाचा – “…आणि लगेच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिशे यांची हत्या झाली” संजय राऊतांचं मोठं विधान!

यावेळी माजी युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास कुरुंगुळे यांनी सांगितले की, “सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांचा एकच उद्योग आहे, की वरिष्ठांना खूश करायचं आणि त्यांना कसं चांगलं वाटेल, यासाठी जमिनीवर काम न करता केवळ हवेत बाता मारायच्या. याचा एक निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचं जे बंद कार्यालय आहे तिथे आम्ही आंदोलन केलं. जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्ता आणतो अशा वल्गना करत आहेत, त्यांनी अगोदर आपलं कार्यालय उघड आहे की नाही हे बघावं. आज या बंद कार्यालयासमोर आम्ही आंदोलन केलं आहे आणि त्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. आमदार प्रणिती शिंदे यांचा जयघोष केला. ज्या स्वत:च्या संघर्षातून तीनवेळा निवडून आल्या आहेत. जनतेची काम करून, २४ तास जनतेत राहणाऱ्या आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. भारतीय संस्कृतीची कुठलीही तमा न बाळगता काँग्रेस भवनासमोर ज्या पद्धतीने पोस्टर लावलं गेलं आहे. याचा मी निषेध व्यक्त करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना इशार देऊ इच्छितो, काँग्रेस हा राष्ट्रवादीचा कायम मोठा भाऊ राहिलेला आहे. तुम्ही लहान भावाच्या भूमिकेत राहिला आहात. म्हणून आम्ही आतापर्यंत आम्ही खूप सहन केलं, सामंजस्याने वागलो. अगोदर तुम्ही मुद्य्यावर बोलत असाल तर आम्ही मुद्य्यावर येऊ, मात्र जर तुम्हाला मुद्य्याची भाष समजत नसेल तर आगामी काळात युवक काँग्रेस त्यांना गुद्य्याची भाषा सुद्धा शिकवल्याशिवाय राहणार नाही.”

बेडकाचा बैल कधी होत नसतो –

याशिवाय, “बेडकाचा बैल कधी होत नसतो, तो होण्याची सुद्धा तुम्ही कधी प्रयत्न करू नका. राष्ट्रवादी काँग्रेसने सोलापुरात सर्व जागा लढवल्या परंतु सोलापुरच्या जनतेने त्यांची केवळ चार नगरसेवकांवर बोळवण केली. म्हणून त्यांनी आपली ताकद पक्ष वाढवण्यावर खर्च करावी. केवळ आपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी अशाप्रकारे स्टंटबाजीचा उपयोग करू नये, आम्हाला वेगळ्या पद्धतीने रस्त्यावर उतरायला लावू नका, अशी विनंती करतो.” असंही ते म्हणाले.

प्रणिती शिंदे अंगार आहे बाकी सब भंगार –

याबरोबर काँग्रेस माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी यावेळी म्हटले की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी होते, ज्यांनी काँग्रेस भवनासमोर येऊन गोंधळ घातला. बॅनरबाजी करून, शोबाजी करून गेले. त्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण सोलापुर शहरातील आपलं कार्यालय अगोदर सुरू करा, नंतर शोबाजी करा. या नेत्यांना त्यांच्या घराच्या आजूबाजुलाही कोणी ओळखत नाही आणि ते काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात बोलतात. प्रणिती शिंदे अंगार आहे बाकी सब भंगार आहे. राष्ट्रवादी जिवंत आहे केवळ काँग्रेसमुळेच आणि काँग्रेस आमदारावरच तुम्ही टीका करतात. तुमची लायकी काय?”

रोहित पवारांनी जामखेड आणि कर्जतकडे लक्ष द्यावं –

याशिवाय, “माझी रोहित पवारांना विनंती आहे, आपण जामखेड आणि कर्जतकडे लक्ष द्यावं. इथे सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे सक्षम आहेत. इथले काँग्रेस नेते, महाविकास आघाडीचे नेते सक्षम आहेत. असं असताना आपण आपल्यात भांडत बसू नका. सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांच्या विचारांशी तुमचा विचार मिळाला तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. नाहीतर आम्ही सर्वजण तुमच्याविरोधात जायला कधीही तयार आहोत. आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन केलं आहे. आम्ही कोणाच्या विरोधात नाही, परंतु आमच्या नेत्या प्रणिती शिंदे अंगार आहेत बाकी सगळे भंगार आहेत.”

लोकसभेच्या सोलापूर जागेबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सुप्त संघर्ष निर्माण झाला आहे.

रोहित पवार काय म्हणाले? –

सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांना सलग दोनवेळा पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूरची राखीव जागा काँग्रेसने स्वतः न लढविता राष्ट्रवादीला द्यावी, अशी मागणी या पक्षाच्या स्थानिक पातळीवर होत आहे. अलिकडेच रोहित पवार यांनीही सोलापूर भेटीत, सोलापूर लोकसभेची जागा कोणी लढवायची, याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत होईल, असे विधान केले होते. त्यांनी सोलापूर लोकभा जागेवर अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचा दावा सांगितल्यामुळे सोलापुरात दोन्ही काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटले आहे.

Story img Loader