औरंबगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाला. राहुल विजय थोरात(२३) असं मयत तरुणाचं नाव आहे. काल संध्याकाळी नऊच्या सुमारास हा अपघात घडला.
नारेगाव येथील आनंद गडेनगर येथे ही घटना घडली. मिरवणुकीदरम्यान वाजवण्यात येत असलेल्या डीजेला जो विजेचा पुरवठा केला जात होता, त्या तारेचा शॉक लागल्याने राहुल बेशुद्द पडला. त्याला शहरातील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात रात्री उशिरा आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.