येथील रणजीत सुनील गिरी वय २३ वर्ष  या युवकाचा प्रेम संबंधातून खून करून त्याचा मृतदेह कुकडी कालव्याच्या पाण्यामध्ये फेकून दिला. ही घटना आज दिनांक २३ रोजी दुपारी दोन वाजता अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये घडली आहे.तालुक्यातील नांदगाव शिवारामध्ये पाण्यामध्ये वाहून जात असलेला मृतदेह नागरिकांनी पाहिला आणि त्यानंतर पोलिसांना कळवले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

हेही वाचा >>> MPSC च्या विद्यार्थ्यांना खूशखबर! कमाल वयोमर्यादेत वाढ; राज्य सरकारच्या जीआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?

याबाबत घडलेली हकीकत अशी की बीड येथे राहणारा रणजीत सुनील गिरी हा हॉटेल आणि ढाब्यावर आचारी म्हणून काम करत होता. मात्र मागील अनेक दिवसांपासून तो गायब होता. घरच्यांची संपर्क केल्यावर  फोनवरून तो मी व्यवस्थित आहे असे सांगत होता. यामुळे नातेवाईक देखील तो कुठेतरी ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये काम करत असेल असे त्यांना वाटत होते.

सध्या कुकडीचे आवर्तन सुरू आहे. नांदगाव शिवारामध्ये कुकडी कालव्याच्या पाण्यामध्ये नागरिकांनी एक मृतदेह वाहत आल्याचे पाहिले. यानंतर पोलिसांना याबाबत माहिती कळवण्यात आली. घटनास्थळी तात्काळ पोलीस पथक दाखल झाले आणि त्यांनी नागरिकांच्या मदतीने तो मृतदेह वरती काढला. मयताचे नाव रणजीत सुनील गिरी हे असल्याचे समजले. यानंतर त्याच्या नातेवाईकांना याबाबत पोलिसांनी फोनवरून माहिती दिली.

दरम्यान मृतदेह कर्जत येथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये शव विच्छेदानासाठी आणण्यात आला होता. यावेळी त्याच्या गळ्याभोवती जखम झाल्याचे व फाशी दिल्यासारखा वन असल्याची दिसून आले. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली एक तर सध्या बीडमध्ये वातावरण अतिशय संवेदनशील झालेले आहे. यामुळे कर्जत येथे जिल्हा पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक हे देखील आले व त्यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी देखील केली.

अवघ्या काही मिनिटांमध्ये रहस्य उलगडले

कोणत्याही गंभीर गुन्ह्याचा अतिशय चाणाक्षपण शोध लावणारे पोलीस निरीक्षक मारुती मुळक यांनी अवघ्या काही वेळातच या सगळ्या घटनेचा व खुनाचे नेमके रहस्य काय आहे ते शोधून काढले.

रणजीत गिरी याचा खून झाला असून, त्याला रविवारी रात्रीच कुकडी काव्यामध्ये खून करणाऱ्या नी फेकून दिले. त्यांना वाटले की मृतदेह वाहून जाईल मात्र तसे घडले नाही. आणि मृतदेह पाण्यामध्ये वाहताना अडकला तसाच त्याची खून करणारे देखील मारुती मुळक यांच्या चाणक्ष नजरेमध्ये अडकले.

मयत हा देखील आरोपीच

रनजीत सुनील गिरी हा देखील आरोपीच होता. त्याच्यावर मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार या वास्को अंतर्गत कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. जानेवारी महिन्यापासून तो कर्जत येथील पोलीस कोठडीतच होता. तीन महिन्यापूर्वी त्याची सुटका झाली होती.

सुटका झाल्यानंतर देखील मयत रणजीत गिरी हा याच परिसरामध्ये बीडला न जाता राहत होता. आणि यानंतर ही घटना घडली आहे यामुळे मयत रणजीत यास ज्या कारणासाठी अटक झाली होती त्याच कारणाशी निगडित या खुना चे रहस्य एकच आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत या घटनेच्या संदर्भात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.

Story img Loader