बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर मागील वर्षभरापासून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यासह अन्य पवार कुटुंबातील सदस्य सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी एकत्र आल्याचे दिसून आले नाही. पण आज कन्हेरी यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्याकडून मानाची गदा देण्यात आली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा – पुणे : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकाकडून मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
हेही वाचा – पुणे: लक्ष्मी रस्त्यावर तरुणाला मारहाण करून तीन लाखांची रोकड लूट
यावेळी जय पवार यांना खांद्यावर घेऊन आयोजकांकडून मैदानाला फेरी मारण्यात आली. मात्र या स्पर्धेवेळी जय पवार आणि युगेंद्र पवार हे समोरासमोर आले. त्यावेळी दोघांनी एकमेकांची गळाभेट देखील घेतली.
First published on: 31-08-2024 at 23:18 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth leaders jai pawar and yugendra pawar face to face in wrestling arena in kanheri svk 88 ssb