कोल्हापूरकर १६ वर्षीय शाहू माने याने भारताला युवा ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिले पदक मिळवून दिले आहे. त्याच्या या पदकामुळे अर्जेंटीनाच्या ब्यूनस आयर्स येथे रविवारपासून सुरू झालेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आपलं पदकांचं खातं खोललं आहे. नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात शाहुने रौप्य पदकाची कमाई केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


अंतिम सामन्यात अवघ्या 1.7 गुणांनी शाहुचं सुवर्ण पदक हुकलं. अंतिम सामन्यात त्याने एकूण 247.5 गुण मिळवले. तर रशियाच्या ग्रिगोरी शामाकोव याने 249.2 गुण मिळवून सुवर्ष पदक पटकावलं, आणि सर्बियाच्या अलेस्का मिट्रोविक याने 227.9 गुण मिळवून कांस्य पदक मिळवलं. शाहु माने हा एकमेव भारतीय नेमबाज या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र ठरला होता. पात्रता सामन्यांमध्ये त्याने शानदार प्रदर्शन करताना एकूण 623.7 गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth olympics shooting tushar shahu mane wins first silver medal in 10m air rifle
Show comments