महाबळेश्वरच्या ऑर्थरसिट पॉईंटवरून उडी मारून एका युवकाने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. चार दिवसांपूर्वीच महाबळेश्वरच्या लिंगमळा पॉईंटवरून उडी मारत प्रेमी युगुलाने त्यांचं आयुष्य संपवल्याची घटना ताजी असतानाच ही आणखी एक घटना समोर आली आहे. ऑर्थरसिट पॉईंटवरून एक हजार फूट खोल दरीत उडी मारून या युवकाने आत्महत्या केली. संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली, त्यानंतर अंधार पडल्याने या युवकाचा मृतदेह अद्याप बाहेर काढण्यात आलेला नाही. या ठिकाणी एक मोटरसायकल पोलिसांना सापडली आहे. या मोटरसायकलचा क्रमांक एम. एच. १६ बी. इ ४४५० असा असल्याचीही माहिती मिळाली आहे. मोटरसायकल मालकाचे नाव बापूसाहेब गायकवाड (अहमदनगर) असे असल्याचे समजते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाबळेश्वर सात किमी अंतरावर लिंगमळा धबधबा आहे. एका प्रेमी युगल दाम्पत्याने आपल्या हाताच्या नसा कापुन घेवुन तीनशे फुट खोल दरी लिंगमळा धबधब्यावरून उडया मारून आत्महत्या केल्याची खळबळ घटनेला चार दिवस होत नाहीत तोपर्यंत आज बुधवार संध्याकाळच्या सुमारास एका युवकाने ऑर्थरसिट पॉईंटवरून एक हजार फtट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही माहिती तेथील स्थानिक व्यवसायिकांनी दिली आहे. या युवकाची मोटरसायकल पोलिसांना मिळून आली आहे. या युवकाचा मृतदेह वरून दिसतो आहे. रात्र झाल्याने गुरूवारी सकाळी त्याचा मृतदेह वर काढला जाणार आहे असे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले.