करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही लोक करोनातून बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला भारतासह संपूर्ण जग करोना विषाणूविरोधात लढत आहे. भारतात लॉकडाउन असल्याने हातावर पोट असलेले लोक, गरीब आणि गरजू नागरिक यांची उपासमार होऊ लागली आहे. रोजंदारीवर पैसे कमावून घर चालवणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत. याशिवाय, देशभरातील पोलीसदेखील २४ तास ऑन ड्युटी असून आपले कर्तव्य बजावत आहेत. याच पोलिसांना भारताचा स्टार माजी फलंदाज युवराज सिंग याने एक व्हिडीओ पोस्ट करून सलाम केला आहे.

“लोकं उपासमारीने मरत आहेत, नी कुकिंगचे व्हिडीओ कसले टाकता?”; सानिया मिर्झा भडकली

पोलीस भर उन्हात गस्त घालत असताना त्यांना एक वयस्क वाटसरू दिसला. वाटसरू डोक्यावरून कसलं तरी ओझं घेऊन चालला होता. गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्या वाटसरूला रस्त्याच्या कडेला सावलीत बसायला सांगितलं. त्याची आपुलकीने विचारपूस केली. विचारपूस करताना तो वाटसरू चार दिवसांपासून उपाशी असल्याचे पोलिसांना समजलं. त्यानंतर त्या पोलिसांपैकी एकाने चक्क आपल्या डब्यातील जेवण त्या वाटसरूला खाऊ घातले. युवराजने हा व्हिडीओ शेअर केला असून त्यावर छानशी प्रतिक्रियादेखील दिली आहे. हा व्हिडीओ अत्यंत माणुसकीचं एक जिवंत उदाहरणच आहे असे म्हणत युवराजने त्या पोलिसांना सलाम ठोकला आहे.

अभिनेत्री, सूत्रसंचालक, निर्माती आणि बरंच काही… पाहा पल्लवी जोशीचा यशस्वी प्रवास

पाहा व्हिडीओ –

आफ्रिदीचं कौतुक करताच नेटक-यांनी भज्जी, युवीला घेतलं फैलावर

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी येत्या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटे लाइट बंद ठेऊन, मेणबत्ती, फ्लॅशलाइट लावा असे आवाहन केले. करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. त्यामुळेच आपण सर्वांनी रविवारी रात्री नऊ वाजता घरातील सगळे लाइट्स बंद करुन घराच्या दारात किंवा बाल्कनीमध्ये एक दिवा, मेणबत्ती, बॅटरी किंवा मोबाई फ्लॅशलाइट लावावी अशा शब्दांमध्ये मोदींनी हे आवाहन केले आहे.

Story img Loader