पैशांची भिशी याबद्दल आपण ऐकलं असेल, पण तुम्ही कधी झाडांच्या भिशीबद्दल ऐकलं आहे का? सोलापुरमध्ये ही झाडांची भिशी सुरू आहे. डॉ. सचिन पुराणिक यांच्या पुढाकाराने २०१६ साली झाडांची भिशी हा अनोखा उपक्रम सोलापुरमध्ये सुरू करण्यात आला. भिशीच्या जमलेल्या पैशांतून वृक्षारोपण आणि त्यांच्या संवर्धनाचं काम डाॅ. सचिन पुराणिक आणि त्यांचे सहकारी डाॅ. यशवंत पेठकर करत आहेत.
डाॅ. सचिन पुराणिक आणि डाॅ. यशवंत पेठकर यांनी सामाजिक दृष्टीकोनातून सुरू केलेल्या या उपक्रमाशी आता शहरातील नागरिक तसंच काही संस्थादेखील जोडल्या गेल्या आहेत. सुरुवातीला २० जणांचा असलेला हा चमू आता ९० सभासदांपर्यंत पोहोचला आहे. ही अनोखी संकल्पना डाॅक्टरांना नेमकी सुचली कशी? त्यावर कशाप्रकारे काम सुरू आहे? हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण मुलाखत नक्की पाहा.