महाराष्ट्रातील पहिला झिका रुग्ण सापडलेल्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर गावाला केंद्रीय आरोग्य पथकाने आज भेट दिली. यावेळी आरोग्य पथकाने परिसराची पाहणी आणि नागरिकांना मार्गदर्शन केले. सध्या बेलसर परिसरातील सहा गावांमध्ये १५ टिम कार्यरत असून रॅपिड टेस्ट सुरू आहेत. येथील सर्व माहिती केंद्राच्या कुटुंब कल्याण मंत्रालयाला दिली जाणार आहे. केंद्रीय आरोग्य पथकामध्ये डॉ. मंगेश गोखले (एनआयव्ही,पुणे), हिम्मत सिंह पवार (एन.आय.एम.आर,दिल्ली), डॉ.नयन शिल्पी (स्त्रीरोगतज्ज्ञ,लेडी हार्डींग वैद्यकीय महाविद्यालय,दिल्ली), अजय बेंद्रे (डी.एम.ओ,पुणे),डॉ महेंद्र जगताप (स्टेट ऎंन्टोमॉलॉजिस्ट) आणि डॉ प्रणील कांबळे ( राज्य आरोग्य विभाग ) आदींचा समावेश होता. १६ जुलैपासून या परिसरातील १४२ रुग्णांचे नमुने तपासण्यात आले आहे. त्यामध्ये ५ डेंग्यू, ६३ चिकनगुनिया व एक झिकाचा रुग्ण आढळून आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा