या आठवड्यात सर्वात जास्त चर्चा आहे तर ती म्हणजे आमिरने साकारलेल्या पीके या भूमिकेची. पीके या पात्राचे लूक, त्याची बोलण्याची पद्धत, चेह-यावरचे हावभाव सर्वच काही लक्ष्य वेधणारे आहे. पण, जर एका गोष्टीबाबत नक्कीच बोलायला हवं ते म्हणजे आपण पीकेकडून काय शिकायला हवं याबाबत. निष्पाप पीके आपल्याला भरपूर काही शिकवतो. तुम्हाला अजूनही पटलेलं नाही का? तर जगतजननी म्हणजेच अनुष्काचा हा नंगा पुंगा दोस्त (पीके) आपल्याला या पुढील गोष्टी शिकवतो.
१. पीकेकडून घेण्यासारखी पहिली गोष्टी म्हणजे निष्पापपणा. निष्पाप असणे हे नेहमीच चांगले नाही पण हा एक असा विशेष गुण आहे ज्याचा आपल्याला नक्कीच लाभ होऊ शकतो. अखेर लहान मुलासारखं निष्पाप डोळ्यांनी जगाकडे पाहण्यापेक्षा अधिक चांगलं काही होऊ शकतं का? नाही ना.
२. निष्पापणासोबतच पीकेमध्ये लहान मुलांप्रमाणे कुतुहल आणि खोडकरपणा आहे. तो खूपसारे प्रश्न विचारतो, वेगळ्याच अशा खोडकर पद्धतीने तो कायद्याचे उल्लंघन करतो आणि आपले आयुष्य मजेशीर बनवतो. हे आपण सर्वांनी शिकले पाहिजे. असेच खोडकर व्हा पण याचे रुपांतर ठरकी छोकरोत होऊ देऊ नका.


३. त्याच्यामधील आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्याची कल्पक बुद्धिमत्ता. लोकांचा सतत मार खाऊन आणि “पीके है क्या?” या प्रश्नाला कंटाळल्यानंतर तो एक अनोखी शक्कल लढवतो. स्वतःचा बचाव करण्यासाठी तो गालावर देवांच्या फोटोचे छाप काढतो. त्याने काय होते हे या व्हिडिओत पहा.  

४. आपल्या आजूबाजूच्या गोष्टी अधिक चांगल्या आणि सुधारित करण्याचा आपला दृष्टीकोन असायला हवा. आणि हेच पीकेला समजलं. काहीतरी चांगलं करण्यास जाताना तो संकटात पडला पण त्यामुळे तो थांबला नाही किंवा त्याने माघारही घेतली नाही. त्याचप्रमाणे, आपणही स्वतःला सुधारण्यासाठी प्रयत्न करत राहिलं पाहिजे आणि आजूबाजूलाही बदल घडवून आणावयास हवे. हा पण पीकेपक्षा थोडी अधिक काळजी घ्यायला विसरू नका.

५. सर्वात शेवटचं म्हणजे, पीकेसारख विक्षिप्त बनण्याचा निदान प्रयत्न आपण करू शकतो. त्याची कपडे घालण्याची पद्धत, त्याची बोली आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा फार आश्चर्यकारक आहे. हे इतकं सोपं नाही पण निदान हे जाणून घेण्यासाठी सर्वोत्तम मार्ग शोधून काढूच शकतो ना?
१९ नोव्हेंबरला ‘पीके’ प्रदर्शित होत आहे. तेव्हा पीकेची जादू तुमच्यावर नक्कीचं चालेल.
collage1(5)collage2(4)