या आठवड्यात सर्वात जास्त चर्चा आहे तर ती म्हणजे आमिरने साकारलेल्या पीके या भूमिकेची. पीके या पात्राचे लूक, त्याची बोलण्याची पद्धत, चेह-यावरचे हावभाव सर्वच काही लक्ष्य वेधणारे आहे. पण, जर एका गोष्टीबाबत नक्कीच बोलायला हवं ते म्हणजे आपण पीकेकडून काय शिकायला हवं याबाबत. निष्पाप पीके आपल्याला भरपूर काही शिकवतो. तुम्हाला अजूनही पटलेलं नाही का? तर जगतजननी म्हणजेच अनुष्काचा हा नंगा पुंगा दोस्त (पीके) आपल्याला या पुढील गोष्टी शिकवतो.
१. पीकेकडून घेण्यासारखी पहिली गोष्टी म्हणजे निष्पापपणा. निष्पाप असणे हे नेहमीच चांगले नाही पण हा एक असा विशेष गुण आहे ज्याचा आपल्याला नक्कीच लाभ होऊ शकतो. अखेर लहान मुलासारखं निष्पाप डोळ्यांनी जगाकडे पाहण्यापेक्षा अधिक चांगलं काही होऊ शकतं का? नाही ना.
२. निष्पापणासोबतच पीकेमध्ये लहान मुलांप्रमाणे कुतुहल आणि खोडकरपणा आहे. तो खूपसारे प्रश्न विचारतो, वेगळ्याच अशा खोडकर पद्धतीने तो कायद्याचे उल्लंघन करतो आणि आपले आयुष्य मजेशीर बनवतो. हे आपण सर्वांनी शिकले पाहिजे. असेच खोडकर व्हा पण याचे रुपांतर ठरकी छोकरोत होऊ देऊ नका.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा