‘धूम ३’ चित्रपटातील ‘साहीर’ या चोराची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी आमिरने घेतलेल्या मेहनतीचे अनेक व्हिडिओ चित्रपटकर्त्यांकडून प्रसिध्द करण्यात येत आहेत. आमिरने योग्य हेअर स्टाईल, अॅक्रोबॅट अॅक्ट आणि टॅप डान्स शिकण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे व्हिडीओ आपण पाहिले. चित्रपटातील ‘मलंग’ या कतरिना कैफबरोबरच्या गाण्यासाठी अमिरने केवळ ‘अॅक्रोबॅट अॅक्ट’ न शिकता ‘बॉडी-पेंट’ देखील करून घेतले आहे. आमिर खानच्या वेल-टोन्ड बॉडीवर हे सुंदर पेन्टींग करण्यात आले आहे. हे पेंटींग करण्यासाठी खास लॉस एंजिलिसवरून प्रसिध्द ‘एअर ब्रश मेकअप आर्टिस्ट’ अॅडम टेनेनबाउंमला पाचारण करण्यात आले. आमिरचा हा मेकअप करण्यासाठी त्याला तीन तासांचा अवधी लागला.
पाहाः कतरिनाच्या कमली गाण्याचा प्रोमो
पाहा : ‘धूम ३’साठी आमिरचा ‘टॅप डान्स’ शिकतांनाचा व्हिडिओ
पाहाः ‘धूम ३’मधील आमिर आणि कतरिनाची अॅक्रोबॅट अॅक्ट तयारी
पाहा : ‘धूम ३’ चित्रपटातील आमिरच्या परफेक्ट लूकचा व्हिडिओ
आमिरने कॉश्चूम घातल्याचा भास होत असल्याचे या गाण्याचा व्हिडिओ पाहीलेल्या अनेकांनी म्हटले आहे. प्रत्यक्षात हे बॉडी-पेंटींग असल्याचे हा व्हिडिओ पाहिल्यावर समजते. या सर्व व्हिडिओंमधून आमिरची मेहनत दिसून येते. ‘धूम ३’ चित्रपटाचे दिगदर्शन विजय कृष्ण आचार्य यांचे असून, कतरिना कैफ, अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा यांच्या देखील भूमिका आहेत. २० डिसेंबरला हा चित्रपट सिनेमागृहात झळकणार आहे.

Story img Loader