सचिनचे असंख्य चाहते आहेत. यामधला एक चाहता आहे तो म्हणजे बॉलीवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान. सचिनच्या या चाहत्याने मास्टर ब्लास्टरच्या शेवटच्या कसोटी सामन्यात ‘धूम-३’चे शीर्षक गीत त्याला अर्पण करण्याचे ठरविले आहे.
अभिनेता आमिर खान स्वत: सचिनचा खूप मोठा चाहता आहे. सिनेमा प्रसिद्धीचे तंत्र आमिरला चांगलंच अवगत असल्याने त्याने सचिनची निवृत्ती आणि आपल्या आगामी ‘धूम ३’ या चित्रपटाची सांगड घालून प्रमोशनचा नवा फंडा समोर आणला आहे. आमिर म्हणाला की, सचिनने त्याच्या कारकिर्दीत क्रिकेट क्षेत्रात, आपल्या मनात, गोलंदाजांच्या स्वप्नात, जगभरातील क्रिकेटच्या खेळपट्टीवर आणि प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या हृदयामध्ये धूम ठोकली आहे. त्यामुळेच ‘धूम ३’चे टायटल साँग त्याला अर्पित केले जाणार आहे. सचिन भारतीयांच्या अभिमानाचे मूर्तिमंत स्वरूप आहे. सचिनची निवृत्ती आपल्या सर्वांनाच सातत्याने त्याची कमतरता भासवेल, असेही आमिर म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा