‘धूम ३’ चित्रपटाच्या प्रतिक्षेत असलेल्या चाहत्यांसाठी कदाचीत हा धक्का असू शकतो. कारण बॉलिवूडचा सुपर स्टार अमिर खानला स्वत्त:लाच त्याच्या ‘धूम ३’ चित्रपटाकडून तिकीट बारीवर काहीतरी चमकदार कामगिरी करण्याच्या अपेक्षा नाहीत. मात्र, बऱ्याच दिवसांपासून अमिर, कतरिना यांच्या ‘धूम ३’च्या प्रतिक्षेत असणाऱ्या प्रेक्षकांना अमिरचे म्हणणे कितपत पचनिपडते ते पाहावे लागेल.
“मला ‘धूम ३’कडून तिकीट बारीवर काही विशेष करण्याच्या अपेक्षा नाहीत. मी या सर्व गोष्टींचा विचार देखील करत नाही. प्रेक्षकांना चित्रपट आवडणे महत्त्वाचे आहे,” असे अमिर म्हणाला.
प्रेक्षकांना आकड्यामध्ये रस नसल्यामुळे मला देखील त्यात रस नाही. चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडायला हवा, हे माझ्यासाठी महत्त्वाचे असल्याचे अमिर म्हणतो. “‘मुघले आझम’, गुरूदत्त यांचा ‘प्यासा’ माझ्या हृदयाला भिडलेले चित्रपट आहेत. चित्रपटाच्या कथेविषयी व त्यातून दाखवण्यात आलेल्या भावनांविषयी चर्चा व्हावी नाही की आकड्यांविषयी, असे अमिर खान याने सांगितले.
दरम्यान, ‘धूम ३’ चित्रपट प्रेक्षकांना आवडेल की नाही या चिंतेमुळे अमिर खान याने पुन्हा स्मोकींग सुरू केली असून, तो त्यापासून पुन्हा दुर जाऊ इच्छीत आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा