कतरिना कैफ आणि रणबीर कपूर सध्या छायाचित्रकारांच्या निशाण्यावर आहेत. आपली रणबीरसोबतची बिकनीमधील छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यामुळे चिडलेल्या कतरिनाने सर्व माध्यमांसाठी एक खुले पत्र लिहले आहे. तिने पत्रात म्हटले आहे की, माध्यमांनी प्रदर्शित केलेल्या या छायाचित्रांमुळे मी अस्वस्थ आणि त्रस्त झाले असून, स्पेनमध्ये सुट्टीचा आनंद घेत असताना माझ्या परवानगीशिवाय छायाचित्रे काढून केवळ प्रसिद्धिकरिता त्यांचा वापर केला गेला. ही छायाचित्रे प्रसिद्ध केलेल्या सर्व माध्यमांना मी विनंती करते की त्यांनी यापासून दूर राहावे. माध्यमांसोबत माझे चांगले संबंध राहिले असून मी नेहमीच त्यांच्यासाठी उपलब्ध असते. त्यामुळे त्यांनी असे आक्रमक वर्तन करण्याचे कारण नाही.
‘अजब प्रेम की गजब कहानी’ चित्रपटाच्या चित्रिकरणापासून जवळ आलेल्या रणबीर-कतरिनाने त्यांच्यातील प्रेमसंबंधाचा अद्याप स्वतःहून खुलासा केलेला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा