मुंबईच्या सागर किनारी पोलिसांच्या तुकडीला सराव करताना पाहून, पोलिसांविषयी कमालीचा आदर असल्याची भावना अभिनेता अक्षय कुमारने व्यक्त केली. टि्वटरवरील आपल्या संदेशात तो म्हणतो, जुहू चौपाटीवर पोलिसांची एक तुकडी सराव करताना नजरेस पडली. आपण घरात आरामात दिवस घालवत असताना आपल्या सुरक्षिततेसाठी पोलिसांना सराव करताना पाहून त्यांच्याविषयी कमालीचा अभिमान आणि आदर वाटतो. आपल्या कर्तव्यापासून कधीही दूर न राहाणाऱ्या पोलिसांना सलाम. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारचा ‘हॉलिडे – अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्युटी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केलेल्या या चित्रपटात त्याने सैन्यदलातील एका अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. निरज पांडे दिग्दर्शित ‘बेबी’ हा त्याचा आगामी चित्रपट समाजातील भ्रष्टाचारावर आधारित आहे. ‘डेअर-२-डान्स’ या त्याच्या रिअॅलीटी शोच्या कार्यक्रमादरम्यान आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या सामाजिक मुद्यावर आधारित कार्यक्रमाप्रमाणे छोट्या पडद्यावर एखादा समाजपयोगी कार्यक्रम करायला आवडेल का असा प्रश्न विचारला असता, चित्रपटाच्या माध्यमातून थोड्याफार प्रमाणात आपण समाजपयोगी काम करत असल्याचे तो म्हणाला.
पोलिसांचा अभिमान वाटतो – अक्षय कुमार
मुंबईच्या सागर किनारी पोलिसांच्या तुकडीला सराव करताना पाहून, पोलिसांविषयी कमालीचा आदर असल्याची भावना अभिनेता अक्षय कुमारने व्यक्त केली.
First published on: 09-09-2014 at 03:58 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar feels proud of the policemen