मुंबईच्या सागर किनारी पोलिसांच्या तुकडीला सराव करताना पाहून, पोलिसांविषयी कमालीचा आदर असल्याची भावना अभिनेता अक्षय कुमारने व्यक्त केली. टि्वटरवरील आपल्या संदेशात तो म्हणतो, जुहू चौपाटीवर पोलिसांची एक तुकडी सराव करताना नजरेस पडली. आपण घरात आरामात दिवस घालवत असताना आपल्या सुरक्षिततेसाठी पोलिसांना सराव करताना पाहून त्यांच्याविषयी कमालीचा अभिमान आणि आदर वाटतो. आपल्या कर्तव्यापासून कधीही दूर न राहाणाऱ्या पोलिसांना सलाम. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारचा ‘हॉलिडे – अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्युटी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केलेल्या या चित्रपटात त्याने सैन्यदलातील एका अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. निरज पांडे दिग्दर्शित ‘बेबी’ हा त्याचा आगामी चित्रपट समाजातील भ्रष्टाचारावर आधारित आहे. ‘डेअर-२-डान्स’ या त्याच्या रिअॅलीटी शोच्या कार्यक्रमादरम्यान आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या सामाजिक मुद्यावर आधारित कार्यक्रमाप्रमाणे छोट्या पडद्यावर एखादा समाजपयोगी कार्यक्रम करायला आवडेल का असा प्रश्न विचारला असता, चित्रपटाच्या माध्यमातून थोड्याफार प्रमाणात आपण समाजपयोगी काम करत असल्याचे तो म्हणाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा