क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे प्रेमप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विराटची फलंदाजी बघण्यासाठी प्रेक्षकांमध्ये बसलेली अनुष्का आणि एखादी मोठी खेळी साकारल्यानंतर बॅट उंचावत तिला फ्लाईंग किस देतानाचा कोहली, हे दृश्य एव्हाना भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या अंगवळणी पडले आहे. सुरूवातीच्या चोरट्या गाठीभेटींनंतर अलीकडे विराट आणि अनुष्काने आपल्या प्रेमाची जाहीर कबुलीही देऊन टाकली. त्यानंतर हे दोघेजण प्रसारमाध्यामां
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मेलबर्न कसोटीच्या अखेरच्या दिवशीही अशाच एका घटनेमुळे विराट-अनुष्का चर्चेत आले. यावेळी समालोचन करत असलेला ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल स्लॅटरने बोलण्याच्या ओघात अनावधनाने अनुष्काचा उल्लेख विराटची पत्नी म्हणून केला. मात्र, ही गोष्ट स्लॅटरच्या तात्काळ ध्यानात आली आणि मग त्याने आपली चुक सुधारत अनुष्का विराटची प्रेयसी असल्याचे सांगितले. मात्र, ही गोष्ट चाणाक्ष श्रोत्यांच्या लक्षात आल्याने क्रिकेट रसिकांमध्ये दिवसभर या किस्स्याची चर्चा चांगलीच रंगली होती. विराट आणि अनुष्काने मात्र यावर काही न बोलणेच पसंत केले.
Michael Slater just described Anushka Sharma as Virat Kohli’s wife, then fiancee. Expect a think-piece in Times of India by close of play.
— Alt Cricket (@AltCricket) December 30, 2014