संजय लीला भन्साली दिग्दर्शित बहुचर्चित ‘रामलीला’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर दिल्लीच्या कडकडडूमा न्यायालयाने देशभरात बंदी घातली आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘रामलीला’ चित्रपटाची आता वाट पाहावी लागणार आहे.
चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत हिंदू संघटनांनी कोर्टात धाव घेतली. त्यानंतर दिल्लीच्या कडकडडूमा न्यायालयाने रामलीलावर ५ डिसेंबरपर्यंत बंदी घातली आहे. मात्र, संजय लीला भन्साळी यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटात रामच्या भूमिका योग्य पद्धतीने दाखवण्यात आलेली नाही. चित्रपटातील काही दृश्यांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार करण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयानेही धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न झाल्याचे म्हटले आहे. या चित्रपटात दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा