रणबीरची पूर्वाश्रमीची प्रेयसी दीपिकाने कतरिनाला प्रेमाचा सल्ला दिला आहे. नुकतीच रणबीर आणि कतरिनाची स्पेनमधील छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. याबाबत दीपिकाला विचारले असता ती म्हणाली, माझ्यासोबत असे कधीही घडले नाही. तुम्ही एक सेलिब्रिटी किंवा समाजातील ख्यातनाम व्यक्ति असाल तर अशा गोष्टी होणे स्वाभाविक आहे. त्यासाठी तुम्ही कोणालाही आरोपी समजू शकत नाही. जर मी एक ख्यातनाम व्यक्ती आहे आणि कोणी माझी छायाचित्रे काढत असेल तर त्यावेळेस मी स्वतः जागरुक राहणे गरजेचे आहे, असे मला वाटते. कतरिनाची रणबीरसोबतची बिकनीमधील छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यामुळे कतरिनाने एक खुले पत्र प्रसारमाध्यमांना लिहले होते.
चेन्नई एक्स्प्रेस प्रदर्शित होण्यापूर्वीच दीपिका शाहरुखसोबत त्याच्या ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. तसेच, इम्तियाज अलीच्या चित्रपटात दीपिका रणबीरसोबत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत विचारल्यास दीपिकाने मौन साधले असून ती म्हणाली, लवकरच तुम्हाला माझ्या आगामी चित्रपटांची माहिती मिळेल. सध्या मी ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या जाहिरातीवर आणि ‘रामलीला’ चित्रपटावर लक्ष्य केंद्रित केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा