शवविच्छेदनाच्या अहवालानुसार बॉलीवूड अभिनेत्री जिया खानचा मृत्यू कोणत्याही बाह्य इजेमुळे न होता तिने गळफास लावल्यानेच झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
२५वर्षीय जिया खानचे आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली याच्याशी प्रेमसंबंध होते. काही दिवसांपासून दोघांमध्ये चाललेल्या वादामुळे तीने तिच्या मुंबईतील राहत्या निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केली होती. जियाच्या आत्महत्येनंतर एक सहापानी पत्र सापडले. या पत्रात काही भावनात्मक गोष्टी लिहिलेल्या होत्या. मात्र पत्रावर कोणत्याही व्यक्तिचा उल्लेख करण्यात आलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या पत्राच्याआधारे जियाच्या आईने तिच्या मृत्युमागे सूरज कारणीभूत असल्याचा आरोप करुन त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यावर पोलिसांनी सूरज पांचोलीला(२१) अटक केली होती. तरी याप्रकरणी हस्ताक्षर तज्ज्ञांकडून पत्रावरील मजकूर हा जियानेच लिहला आहे का याचा तपास पोलीस अद्याप करत आहेत.

Story img Loader