ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणा-या आगामी ‘किक’ चित्रपटातील ‘जुम्मे की रात’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे सलमानच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीचं असणार आहे, असे निर्माता-दिग्दर्शक साजिद नादियदवालाचे म्हणणे आहे.
पाहा सलमान खानच्या ‘किक’चा ट्रेलर
सलमान आणि जॅकलीनवर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे चाहत्यांना थिरकण्यास भाग पाडते. यात सलमान त्याच्या नेहमीच्या अंदाजापेक्षा थोड्या वेगळ्या डान्स स्टेप्स करताना दिसतो. सलमानचा हा डान्स जलवा नक्कीच त्याच्या चाहत्यांना पाहायला आवडेल. लाल रंगाच्या ड्रेसमधील जॅकलीनचा हॉट अंदाज गाण्यात पाहावयास मिळतो. ‘जुम्मे की रात’ गाणे मिका सिंग आणि पलक मुंचल यांनी गायले असून त्यास हिमेश रेशमियाने संगीत दिले आहे.
‘किक’मध्ये रणदीप हुड्डा आणि नवाझुद्दीन सिद्धीकी यांच्याही भूमिका असून हा चित्रपट ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader