बॉलीवूडची ग्लॅमरस अभिनेत्री कतरिना कैफची स्पेनच्या सुट्टीतली बिकिनी छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर रणबीर आणि कतरिनाची काय प्रतिक्रिया उमटतेय, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. रणबीरचे आई-वडील झाल्या प्रकाराने फारच अस्वस्थ झाले आणि त्यांनी प्रतिक्रियाही दिल्या. खुद्द रणबीरने मात्र अजून आपले तोंड उघडलेले नाही. पण, या प्रकाराची सगळ्यात मोठी धास्ती कतरिनाने घेतली आहे. रणबीरबरोबर घालवलेल्या त्या सुट्टीचा आनंद राहिला दूरच; पण, आता बाहेरच काय पडद्यावरही बिकिनी न घालण्याची शपथ कतरिनाने घेतली आहे.
कतरिनाला बिकिनी हा प्रकार नवीन नाही. मग झाल्या प्रसंगावरून बिकिनीचा एवढा बाऊ करण्याची गरज काय, असा प्रश्न एकीकडे विचारला जातो आहे. तर दुसरीकडे या सगळ्या प्रकरणांत आपलाच दोष आहे, असे कतरिनाचे म्हणणे आहे. एवढी गर्दी असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर मी बिकिनी घालणेच चुकीचे होते. आणि ज्या क्षणाला तिथे भारतीय मंडळीही असल्याचे लक्षात आले तेव्हाच आपण इतक्या मनमोकळेपणे समुद्रकिनाऱ्यावर फिरून मोठी चूक केल्याचे माझ्या लक्षात आले होते, असे कतरिनाने म्हटले आहे. कतरिनाला हे शहाणपण फार उशिरा सुचले आहे. पण, झाला प्रकार तिने इतक्या गांभीर्याने घेतला आहे की यापुढे चित्रपटातही बिकिनी शॉट न देण्याचा निर्णय तिने घेतला आहे.
अगदी ‘धूम ३’ मध्येही आदित्य चोप्राने कतरिनाला एका प्रसंगात बिकिनी घालण्याचा आग्रह केला होता. मात्र, तसे करणे आपल्याला पटणारे नाही, असे सांगत तिने आदित्यबरोबर दीर्घ चर्चा केली. अखेर, या दृश्यावर तडजोड करण्याची तयारीही आदित्यने दाखवली आहे. आत्तापर्यंत कतरिनाने जो लौकिक कमावला होता, तो या एका छायाचित्राने धुळीला मिळवला आहे. त्यामुळे यापुढे ताकही फुंकून प्यायचे या निर्धाराने ‘बिकिनी’चा उल्लेखही कतरिना वज्र्य करणारसे दिसते. मात्र, या प्रसंगातला तिचा साथीदार आणि तथाकथित प्रियकर रणबीर कपूरने धरलेली ‘अळीमिळी गुपचिळी’ही आश्चर्यचकित करणारी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा