संजय लीला भन्सालीच्या बहुचर्चित ‘रामलीला’ चित्रपटात आयटम साँग असण्याची चर्चा काही दिवस चालू होती. त्यासाठी आधी ऐश्वर्याचे नाव घेण्यात येत होती. मात्र, ती केवळ एक अफवा ठरून ‘बबली बदमाश’ या आयटम साँगने सर्वांवर जादू करणा-या प्रियांका चोप्राच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आली. अखेर या चित्रपटातील प्रियांकाच्या आयटम साँगचे चित्रिकरण पूर्ण झाले असून या गाण्याद्वारे ती सर्वांना मोहित करण्यास सज्ज झाली आहे.

पहाः ‘राम लीला’ चित्रपटाचा ट्रेलर


‘रामलीला’मधील आयटम साँगचे नृत्य दिग्दर्शन प्रभूदेवाचा भाऊ विष्णू देवा याने केले आहे. फिल्मसिटीमध्ये या गाण्याकरिता एक विशेष सेट उभारण्यात आला होता. विष्णू देवा हा प्रियांकाच्या नृत्याने प्रभावित झाला असून त्याने याबद्दलचे ट्विटही केले आहे. प्रियांकाने नुकतेच ‘जंजीर’ आणि ‘शूटआउट अॅट वडाला’ या चित्रपटांसाठीदेखील आयटम साँग केले होते. विष्णूदेवाचे ट्विट.

Story img Loader