चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानंतर त्यांना कार्यालय आणि घरी पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले आहे. मात्र राम गोपाल वर्मा यांना जीवे मारण्याच्या धमक्या कोणाकडून आल्या याविषयी पोलिसांनी माहिती दिलेली नाही.
राम गोपाल वर्मा यांनी याबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, दूरध्वनी संभाषणातून माझ्या जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्याआधारे त्यांनी मला संरक्षण दिले आहे.  या धमक्या त्यांच्या आगामी ‘सत्या २’ चित्रपटामुळे येत असल्याची चर्चा असली, तरी वर्मांनी याबाबत ट्विटर बोलणे टाळले आहे.
पीटीआयने पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनीही काही माहिती देण्यास नकार दिला. राम गोपाल वर्मांचा ‘सत्या २’ हा चित्रपट आधीच्या नियोजनानुसार शुक्रवारी प्रदर्शित होणार होता.  आता त्याचे प्रदर्शन ८ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.

Story img Loader